गणेश इंगवले / नवी मुंबई
लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चिनची टेनिसपटू जिया जिंग लू आणि स्लोव्हेनियाची तमारा झिदान्सेक यांच्यात अजिंक्यपदासाठी शनिवारी अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीत जिया जिंग हीने ६-३ अशा फरकाने पहिला सेट जिंकला. दुसर्या सेटमध्ये देखील तमाराला मात देत ६-१ गुणांनी हा सेट देखील खिशाल टाकला. आणि आयडब्ल्यूटीसी आंतरराष्ट्रीय महिला टेनिस अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. विजेत्या लू आणि उपविजेत्या तमाराला एनएमएसएचे अध्यक्ष लोकनेते नाईक यांच्या शुभहस्ते चषक आणि रोख रक्कमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी २५ हजार डॉलर रकमेचे पारितोषिक ठेवण्यात आले होते.
पुढील वर्षी आणखी आंतरराष्ट्रीय नामांकीत खेळाडू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला. सहभागी खेळाडूंना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानिक खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत त्यामुळे नवी मुंबईचा क्रीडा क्षेत्रात मागील काही वर्षात लौकीक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयडब्लूटीसी स्पर्धा शहरातील खेळाडूंना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. एनएमएसएचे उपाध्यक्ष डॉ.राणे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद करत एनएमएसएच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा नवी मुंबईतील स्थानिक खेळाडूंना खेळ पाहता यावा. त्यामधून त्यांना काही शिकता यावे यासाठी २०१३पासून ही स्पर्धा भरवित असल्याचे सांगितले.
पारितोषिक वितरण सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. एनएमएसएचे उपाध्यक्ष आयटीएफ टुर्नामेंटचे डायरेक्टर डॉ.दिलीप राणे, देव भट्टाचार्य (डी.जी.एम.इंडियन ऑईल), स्वामिनाथन (डी.जी.एम-अपोलो हॉस्पिटल), सुंदर अय्यर (सचिव महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन), नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.सुमंगल फडणीस, अरुण पाटील, दत्तू पाटील, श्रीकृष्ण लोटलीकर, विक्रम शिंदे, डॉ.अशोक पाटील, विजय रामभाऊ पाटील, अशोक पाटील , विजय सि पाटील, टुर्नामेंटचे परीक्षक नितीन कन्नमवार आदी मान्यवर उपस्थित होते.