संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबईतील पारायण, किर्तने, प्रवचने, भंडारा, सत्संग अथवा धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख, सिडकोचे माजी संचालक, नगरसेवक नामदेव भगत यांची उपस्थिती हमखास असते. अशाच एका धार्मिक कार्यक्रमामध्ये जुईनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालेल्या नामदेव भगत यांचा वारकर्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, विशाल ससाणे व शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले उपस्थित होते.