संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील एमजीएम शाळेमध्ये एका नराधन शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे पालक व बालक दोन्हीही भयभीत झाले असून शाळेत जाण्यास विद्यार्थीनींना व शाळेत आपल्या मुलींना पाठविण्यास पालक आजही भयभीत आहे. या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर 6 मध्ये समाजसेवक प्रल्हाद नारायण पाटील व समाजसेविका सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील यांच्यावतीने नेरूळ सेक्टर 6 परिसरात मंगळवार, दि. 27 डिसेंबर रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर 6 मधील महापालिकेच्या लोकमान्य टिळक समाजमंदिरामध्ये सांयकाळी 6.30 वाजता स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा, समाजसेविका, प्रख्यात साहित्यिक वृषाली मगदूम यांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये शालेय परिसरात, सामाजिक जीवनात, सभोवतालच्या परिसरात वावरताना विद्यार्थीनींनी कसे दक्ष राहावे, विद्यार्थीनीचे मनोबल कसे वाढीस लागेल यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती समाजसेविका सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील यांनी दिली. हे शिबिर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी व पालकांकरता उपयुक्त असल्याने मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होण्याविषयीचे आवाहन समाजसेविका सौ. समुद्रा प्रल्हाद पाटील यांनी केले आहे.