गणेश इंगवले / नवी मुंबई
* महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
* प्रत्येक प्रभागात २ महिला उमेदवार निवडणूक लढवणार
* २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडले जाणार
पनवेल महानगरपालिकेची पहिल्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आणि प्रारूप प्रभागांची रचना (नकाशे) मंगळवारी जाहीर करण्यात आली.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येथे हा कार्यक्रम झाला. प्रशासनाकडून २० प्रभागांचा एकत्रित आणि सर्व प्रभागांचे छोटय़ा आकारातील स्वतंत्र नकाशे आवारात प्रसिद्ध करण्यात आले होते.
महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सोडत जाहीर होताच उपस्थितातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींच्या मनासारखं झाले,तर काहींना आपली संधि हुकल्याचे दुख झालेले दिसत होते. अनेक इच्छुक प्रभाग रचनेवर ही नाराज दिसत होते. त्यामुळे कही ख़ुशी कही गमचे वातावरण दिसू लागले आहे. यावेळी अनेक माजी नगरसेवक , राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रभागाची रचना दाखवणारे ब्यानर लावण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यकमा अंर्तगत प्रांताधिकारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये शहरातील २० प्रभागांचे नकाशे, व्याप्ती व चतुसीमा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. मंगेश चितळे यांनी २० प्रभागांच्या चतुसीमांची माहिती दिली. यावेळी २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात 50% आरक्षण असल्याने महिलांची संख्या देखील पुरूषांच्या बरोबरीने असेल. प्रत्येक प्रभागात २ महिला उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. मतदारांच्या संख्येनुसार अनुसूचित जाती प्रवर्गाच्या जागेसाठी ६ अ, ११ अ, १५ अ, १७ अ या प्रभागांच्या चिठ्ठय़ा काढण्यात आल्या. प्रभाग ६ अ आणि ११ अ हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. तर उर्वरित दोन प्रभाग हे अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी राहिले. ३ अ आणि ९ अ क्रमांक प्रभागातील एसटी जागेसाठी तर त्यातील ३ अ हि जागा एसटी महिला यासाठी राखीव राहिली. तर ओबीसीसाठी १ अ, २ अ , ३ ब , ४ अ , ५ अ , ६ ब , ७ अ , ८ अ , ९ ब , १० अ , ११ ब , १२ ब , १३ ब, १४ अ , १५ ब , १६ अ , १७ ब , १८ अ , १९ अ. २० अ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत.त्यातील २ ब, ३ ब , ५ अ, ६ ब, १२ ब, १३ ब, १६ अ, १७ ब , १८ अ , १९ अ, २० अ हे २१ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. महिला खुल्या प्रवर्गासाठी १ ब , १ क, ,२ क, ४ ब , ४ क , ७ ब ,७ क , ८ ब , ८ क, ९ ड , १० ब , १० क , ११ क , १२ क , १४ ब , १४ क , १५ क , १५ ड ,१६ ब , १७ क , १८ ब ,१९ ब या जागा आरक्षित आहेत. तर उर्वरित १ ड , २ ड, ३ क, ३ ड, ४ ड, ५ क , ५ ड , ६ क , ६ ड , ७ ड , ८ ड , १० ड , १२ ड , १३ क , १३ ड , १४ ड , १५ ड , १६ क , १६ड , १७ ड ,१८ क ,१८ ड , १९ क , १९ ड , २० ब , २० क या जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.