संजय बोरकर / नवी मुंबई
महिला या मुळातच सबला असून सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिलेल्या शिक्षणातून विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत आज त्या सर्वच क्षेत्रात भरारी घेताना दिसतात याचा अभिमान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी महिलांनी स्वत: मधील क्षमता वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीदिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण आणि महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
यावेळी व्यासपिठावर आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, उप महापौर श्री. अविनाश लाड, स्थायी समितीचे सभापती श्री. शिवराम पाटील, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त शहर श्री अंकुश चव्हाण, कार्यक्रमाच्या निमंत्रक व महिला बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सायली शिंदे,आरोग्य समितीच्या सभापती श्रीम. सलुजा सुतार, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती श्री.निवृत्ती जगताप, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सभापती श्री. लिलाधर नाईक, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती श्रीम. तनुजा मढवी, नगरसेवक श्री. संजू वाडे, श्री. सुनिल पाटील,नगरसेविका श्रीम. नेत्रा शिर्के, श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. शशिकला पाटील, श्रीम. हेमांगी सोनावणे, श्रीम.उषा भोईर, श्रीम. रंजना सोनवणे, श्रीम. संगिता बो-हाडे, ॲड. अपर्णा गवते, श्रीम. अंजली वाळुंज, श्रीम.दयावती शेवाळे, श्रीम. उषा पाटील, श्रीम. छाया म्हात्रे, श्रीम. वैशाली नाईक, श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, श्रीम.फशीबाई भगत, श्रीम. दिपा गवते, श्रीम. संगिता म्हात्रे, श्रीम. अनिता मानवतकर, श्रीम. रुपाली भगत,श्रीम. प्रज्ञा भोईर, श्रीम. श्रद्धा गवस, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर,महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या प्रथम सभागृहातील नगरसेविका ते आमदार हा लोकप्रतिनिधी म्हणून झालेला प्रवास कथन करीत महिलांनी स्वत:ला ओळखून काम करीत राहिले पाहिजे, विषय समजून घेऊन सभागृहात बोलत राहिले पाहिजे यातूनच त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल असे सांगून सावित्रीच्या लेकी म्हणून महिलांनी स्वत: ला सिध्द करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकपर मनोगतात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सायली शिंदे यांनी महिला व बालकांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविणारी नवी मुंबई ही देशातील अग्रगण्य महापालिका आहे असे सांगत यापुढील काळात समिती महिला व बालकांच्या कल्याणासाठी अधिक जोमाने व व्यापक स्वरुपाचे काम करेल असा विश्वास व्यक्त केला.
जयंती दिनाचे औचित्य साधून आदर्श सेवाभावी संस्था, हनुमान नगर, तुर्भे नाका, तुर्भे यांना महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल “क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार” मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व मुलींकरीता घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत बेलापूर विभागात दिपाली गणेरकर, प्राजक्ता पालकर, सुनिता काटकर या गुणानुक्रमे तीन तसेच नेरूळ विभागात मधुरा भोईर, शरयू राऊळ, मेधाराणी जोशी या गुणानुक्रमे तीन आणि वाशी विभागात कैलेशा पाटील,सुप्रिया टाव्हरे, मधुरा जाधव या गुणानुक्रमे तीन त्याचप्रमाणे तुर्भे विभागात सुहासिनी पाडळे, नेहा सिंग,प्रिया पाटील या गुणानुक्रमे तीन विजेत्या ठरल्या. रांगोळी स्पर्धेतच कोपऱखैरणे विभागात रसिका जेधे,सुमित्रा घराळ, अनुसया जेठीथोरे, या गुणानुक्रमे तीन व घणसोली विभागात कल्याणी पाटील, लिलावती पाटील, स्मिता रानकर या गुणानुक्रमे तीन, तसेच ऐरोली विभागात वैशाली गतफणे, मंगला भोईर, अर्चना काळे या गुणानुक्रमे तीन त्याचप्रमाणे दिघा विभागात नेहा नवले, मनिषा नवले, दिव्या भावल या गुणानुक्रमे तीन विजेत्या ठरल्या.
निबंध स्पर्धेत हर्षदा तेरसे, स्वाती पालकर, अंजना देवकर या गुणानुक्रमे तीन विजेत्या ठरल्या.पाककला स्पर्धेत प्रतिभा कुलकर्णी, योगिता कांदोळकर, भैरवी मामनिया यांनी गुणानुक्रमे तीन पारितोषिके संपादन केली. सॅलेड सजावट स्पर्धेत भैरवी मामनिया, निलम बळवईकर, लक्ष्मी शेळके या अनुक्रमे तीन क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे या स्पर्धेत सिमा हिरे,शुभांगी तेरसे, प्रिया घेवडे या तीन विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ई-गव्हर्न्सची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याने विजेत्यांची पारितोषिेक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
यावेळी सादर झालेल्या एव्हरशाईन डांन्स ॲकॅडमीच्या मुलांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 111, तुर्भे स्टोअर्स यांनी सादर केलेल्या नराधमांना यम सदनाला पाठवा या गीत नृत्याला उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.