अनंतकुमार गवई / नवी मुंबई
पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील पत्रकारांनी कोपरखैरणे सेक्टर १९ येथील आरंभ फाऊडेशन येथे दिव्यांग मुला -मुलींसोबत आहार – आनंद या कार्यक्रमाचे आयोजन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन शुक्रवारी उत्साहात साजरा केला.
यावेळी नवी मुंबईतील पत्रकारांनी दिव्यांग मुला -मुलींसोबत आहार – आनंद या उपक्रमाचा उपभोग घेतला.या उपक्रमात २२ मुले व ४ मुली व आरंभ फाउंडेशनच्या शिक्षिका व कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक ’दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिव्यांग मुला – मुलींना चॉंकलेट व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा उत्साह वाढवला.तसेच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिव्यांग मुला -मुलींसोबत संवाद साधला.यावेळी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिव्यांग मुला – मुलींसोबत पत्रकारांनी आयोजित केलेल्या आहार – आनंद या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
तसेच नवी मुंबईतील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी,सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने,कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड,आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,ईटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.
वर्षा भगत,क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे,शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते द्वारकानाथ भोईर,नगरसेविका वैशाली नाईक,नगरसेविका सायली शिंदे,समाजसेवक लालचंद भोईर,समुपदेशक माधुरी हेंडवे,क्रीडा प्रशिक्षक सुशिला माने,समाजसेवक गोविंद कुलकर्णी,कंचन फाऊडेशनच्या संचालिका कंचन तोडी- रॉय,समाजसेविका उर्वी मेहता आदी प्रमुख मान्यवर मंडळीं उपस्थित होते.कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी दिव्यांग मुला – मुलींसोबत केक कापून आहार – आनंद या उपक्रमाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद रविदास,चंद्रशेखर हेंडवे,योगेश शेटे,साईनाथ भोईर,शैलेश जाधव, मिलिंद तांबे,संजय गुरव,संतोष वाव्हळ,सुदीप घोलप,दीपक देशमुख,शाहीर सोनकांबळे,प्रदीप वाघमारे,अनिल उबाळे,संदीप राठोड,राहुल कांबळे,नंदकुमार बर्वे,गंगा सिंग राजपुरोहित,बाळकृष्ण खोपडे या नवी मुंबईतील पत्रकारांनी व के.सी.सिंग,अब्दुल सय्यद,भरत जयस्वाल,मेहताब अली नियाजी या छाया चित्रकारांनी मेहनत घेतली.
गेल्या दोन वर्षापासून कोपरखैरणे सेक्टर १९ येथे भाडेतत्वावर आरंभ फाउंडेशनच्यावतीने दिव्यांग मुला – मुलींना शिकविण्याचे कार्य केले जात आहे. दिव्यांग मुला – मुलींना शिकविण्यासाठी ५ शिक्षिका कार्यरत असल्याचे फाउंडेशनच्या संचालिका राखी पंडित यांनी सांगितले.