श्रीकांत पिंगळे / नवी मुंबई
आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत रविवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सानपाडा येथील स्थानिक रहीवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमावेळी स्थानिक नगरसेविका ॠचा पाटील, भाजप महामंत्री डॉ. राजेश पाटील,नगरसेवक सोमनाथ वास्कर, श्रीमंत जगताप, संघाचे अजय मुडपे, युवा मोर्चाचे मोहित बिलाप्पट्टे, संदीप जगदाळे, नवनाथ पोळ, पंकज दळवी, वर्पे, हांडे आदि उपस्थित होते. तसेच परिसरातील असंख्य नागरिक मोठया संख्येने महिला उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना लेखी स्वरूपात आपल्या समस्यांसदंर्भात निवेदन सादर केली परिसरात आरोग्य सुविधा, कचर्याची समस्या, परिसरात उददयाने तैयार व्हावीत, समाज मंदिरे निर्माण व्हावीत, वाचनालयाची सुविधा, आधार कार्ड-रेशनिंग कार्ड याची गरज, परिवहन सेवा वाढवने, ज्येष्ठ नागरीकाना विशेष सेवा पुरवणे, नवी मुंबईत जिल्हा मुख्यालय तयार व्हावे, सानपाडा पारीसरात निवडणूक केंद्राची संख्या वाढ़वणे, पार्कीगंची समस्या, परिसरात बेशिस्तपने पालीकेकडून केली जाणारी झाडांची कत्तल, सार्वजनिक शौचालयाची उभारणी होणे, सानपाडा विभागात पालिकेचे विभाग कार्यालय होणे, परिसरात वाढीव वीज बिल, रोजगाराची उभारणी होणे, नाल्यावर कवच निर्माण व्हावी, सोसायटयांमध्ये फिरकणारी जंगली श्वापदे, परिसरात मद्धपींची समस्या, पोलिस चौक्या निर्माण होणे यासारख्या अनेक समस्या मंदाताई म्हात्रे यांच्या समोर मांडल्या, येणार्या दिवसात सानपाडा विभागातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून आमदार निदीमधून परिसाराचा विकास साधणार असल्याचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितल यावेळी सानपाडा विभागात कार्तिक मंदिर उभारण्यासाठी मंजुरी मिळविल्याबदल नागरिकांनी ताईंचे आभार मानले. यावेळी माजी सैनिकांचा व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.