नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1/01/2017 ते 15/01/2017 या पंधरवडा कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कृषी मंडई, धान्य व भाजीपाला मार्केट इ. ठिकाणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या उप आयुक्त श्रीम. रिता मेत्रेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व उप आयुक्त (परिमंडळ-2) अंबरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने 14/01/2017 रोजी ऐरोली सेक्टर-5 येथील भाजीमार्केट मध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, मार्केट मध्येच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ऐरोली विभागाचे सहाय्यक अधिकारी सदर मोहिमेच्यावेळी ऐरोली विभागातील सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे, स्वच्छता निरिक्षक दिनेश वाघुलदे, महाले, स्वच्छता उप निरिक्षक विशाल खारकर, मार्केट मधील नागरीक, दुकानदार व स्वच्छाग्रही उपस्थित होते.
त्याचप्रमाणे दिनांक 14/01/2017 रोजी वाशी सेक्टर-9 येथील भाजीमार्केट व परिसरात मध्ये नागरीकांच्या सहभागातुन विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे,मार्केट मध्येच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर मोहिमेमध्ये वाशी विभागातील सहाय्यक स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक श्रीम. जयश्री आढाल, संतोष देवरस, यश पाटील, जयेश पाटील, विभागातील उप स्वच्छता निरिक्षक, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठयासंख्येने सहभागी झाले होते.