नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत वाशी बस डेपे येथील नागरी उपजिविका केंद्रामध्ये कागदी / कापडी पिशव्यांचे प्रदर्शन 15जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.
याठिकाणी महिला बचत गटांनी तयार केलेल्या 250 हून अधिक कागदी / कापडी पिशव्यांची विक्री झाली तसेच अनेक नागरिकांनी अशा पिशव्या बनवून देण्याच्या ऑर्डरही दिल्या. यावेळी महापौर सुधाकर सोनवणे व महिला बालकल्याण समिती सभापती श्रीम. सायली शिंदे यांनी याठिकाणी भेट देऊन महिला बचत गट सदस्यांना प्रोत्साहित केले. या स्टॉलमुळे प्लास्टिक निर्मुलन आणि महिला बचत गटांसाठी रोजगार निर्मिती असा दुहेरी उद्देश सफल झाला. नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेला हा स्तुत्य उपक्रम यापुढील काळातही असाच सुरु राहणार असून नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत कर्तव्य भावनेने संपूर्ण सहभाग घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.