• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2017

गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गुजरातने मकरसंक्रातीला रणजी चषकाचा गोडवा लुटला

श्रीकांत पिंगळे

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातने मुंबईवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. कर्णधार पार्थिव पटेलच्या १४३ धावांच्या जोरावर गुजरातने मुंबईच्या ३१२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच गुजरातने दोन फलंदाज गमावले होते. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पार्थिवने कर्णधाराला साजेशी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. सलामीवीर समित गोहिल, मनप्रीत जुनेजा यांना साथीला घेत पार्थिवने गुजरातला पहिल्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले.

रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईने गुजरातसमोर ३१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातने चौथ्या दिवशी सावध सुरुवात केली. चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ धावांची मजल मारली होती. यंदाच्या मोसमात यशस्वी ठरलेला प्रियांक पांचाळ चांगली फलंदाजी करत होता. मात्र पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू होताच मुंबईचा गोलंदाज बलविंदर संधूने दोन फलंदाज बाद करत गुजरातला धक्के दिले. त्यानंतर मैदानात आलेल्या पार्थिव पटेलने सलामीवीर समित गोहिलसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातची धावसंख्या ८९ असताना समित बाद झाला आणि गुजरातला तिसरा धक्का बसला.

समित गोहिल बाद झाल्यानंतर पार्थिव पटेलने मनप्रीत जुनेजाच्या साथीने संघाला विजयाच्या दिशेने नेले. मनप्रीतसोबत शतकी भागिदारी रचत पार्थिव पटेलने गुजरातला सुस्थितीत नेले. तब्बल ४५ षटके या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मनप्रीत जुनेजाने अर्धशतकी खेळी करत कर्णधार पार्थिव पटेलला सुयोग्य साध दिली. गुजरातने दोनशे धावाचा टप्पा ओलांडल्यावर अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मनप्रीत बाद झाला आणि मुंबईच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र यानंतर राजुल भट्टसोबत ९४ धावांची भागिदारी करत पार्थिव पटेलने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. गुजरातला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता असताना पार्थिव पटेल बाद झाला. पार्थिवने १९६ चेंडूंमध्ये १४३ धावांची खेळी साकारली. पार्थिवने या खेळीत २४ चौकार लगावले.

पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर राजुल भट्टने चिराग गांधीसोबत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातने प्रथमच रणजी विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला २२८ धावांवर बाद केले. प्रत्युत्तरादाखल गुजरातने ३२८ धावा करत १०० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर मुंबईच्या फलंदाजांची जबाबदारीने खेळ करत दुसऱ्या डावात ४११ धावा केल्या. मात्र पहिल्या डावात ढेपाळलेली फलंदाजी आणि चौथ्या डाव्यात निष्प्रभ ठरलेली गोलंदाजी यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला.

Previous Post

विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंची आगरी-कोळी महोत्सवाला भेट

Next Post

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

Next Post
वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

वाशी बस डेपोतील महिला बचत गटांच्या कापडी / कागदी पिशव्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला चांगला प्रतिसाद

कृषी मंडई, धान्य व भाजीपाला मार्केट इ. ठिकाणी विशेष स्वच्छता माहिम

कृषी मंडई, धान्य व भाजीपाला मार्केट इ. ठिकाणी विशेष स्वच्छता माहिम

आमदार आपल्या दारी अभियानात आ. मंदाताई म्हात्रेंना उत्स्फूर्त  प्रतिसाद

आमदार आपल्या दारी अभियानात आ. मंदाताई म्हात्रेंना उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com