शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे बुधवारी रात्री पतीसह स्कूटरवरुन प्रवास करत होत्या. यावेळी पाच दुचाकींवरुन दहा जणांनी त्यांचा पाठलाग केला. माधुरी काळे आणि त्यांचे पती प्रशांत काळे घराजवळ पोहोचताच दुचाकीवरुन आलेल्या दहाजणांनी धारदार हत्यारे आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये काळे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी संजय मोरे आणि संजय गायकवाड यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला झाल्याचा आरोप नगरसेविका माधुरी काळे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय मोरे आणि संजय गायकवाड यांचादेखील समावेश आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.