राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची सिडकोच्या एम.डीं.कडे मागणी
संजय बोरकर/ 98699666144
नवी मुंबई : नवी मुंबईच्या निर्मितीसाठी स्थानिकांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोला दिल्या. त्यांचे पुनवर्सन पूर्ण करणे तर दूरच राहिले मात्र त्यांना देण्यात येणार्या सुविधा देखील सिडको काढून घेवू लागली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना सिडकोकडून मिळणारे विद्यावेतन सिडकोने बंद केले आहे या विरोधात सोमवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी सिडकोवर धडक दिली. सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक भूषण गगराणी आणि सह व्यवस्थापकीय-संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन विनाविलंब सुरु ठेवण्याची मागणी करीत त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. हि मागणी एका महिन्यात तातडीने पूर्ण न केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. माजी महापौर सागर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या अधिकार्यांना भेटण्यास ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेश मढवी, बेलापूर विधानसभा अध्यक्ष विशाल डोळस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, माजी नगरसेवक अमित मेढकर, बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष देवनाथ म्हात्रे, सोशल मीडियाचे पदाधिकारी शिरीष वेटा, हरेश भोईर, जयंत म्हात्रे, विठ्ठल बांगर, विशाल तांडेल, राकेश तांडेल आदींचा समावेश होता.

सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्यानंतर त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले. मुलांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी संघर्ष करुन सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांनी विद्यावेतन सुरु करुन घेतले. इयत्ता १०वी पासून पदवी, पदव्युत्तर तसेच आय.टी. शिक्षणासाठी विद्यावेतन देण्यात येते. तशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांना विद्यावेतन दिले जात होते. परंतु आता सिडकोचे जे नोड विकसित झाले आहेत, त्या भागातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना देण्यात येत असलेली विद्यावेतनाची सुविधा बंद करण्यात आली आहे. २४ मार्च रोजी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीतही विद्यावेतन सुरु ठेवण्याचा विषय नामंजुर करण्यात आला. सिडकोच्या हया निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिक्षण घेणे कठिण जाणार आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील विविध नोड विकसित झाले असले तरी हजारो प्रकल्पग्रस्तांची अर्थिक परिस्थिती अजूनही बिकटच आहे. अजूनही प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे साडेबारा टक्क्यांचे भुखंड व नोकर्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना मिळणारे विद्यावेतन बंद केल्यास प्रकल्पग्रस्त आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाहीत. ही बाब प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारी असून सिडकोने त्वरित विद्यावेतन सुरु करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा सिडकोला देण्यात आला आहे
** लोकनेते गणेश नाईक यांच्यामुळे सुरु झाले होते विद्यावेतन
उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना सिडकोने विद्यावेतन सुरु केले होते मात्र नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्या वेतनापासून वंचित ठेवले होते. ही अन्यायकारक बाब समजताच लोकनेते गणेश नाईक यांनी सिडको परिवहन सेवेच्या बसेसची हवा काढत आंदोलन छेडले. त्यामुळे हबकलेल्या सिडकोने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी देखील विद्यावेतन सुरु केले होते.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन कायम स्वरुपी सुरू ठेवण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. विद्यावेतन सुरु ठेवण्याबाबत सिडको सकारात्मक दिसत नसल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार आहोत.
– सुरज पाटील (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष)