नवी मुंबई / साईनाथ भोईर
चैत्र महीना सुरु झाला की प्रत्येक गावो गावी जत्रा हे समीकरण ठरलेल असत. आणि त्यात आगरी कोळी लोकांच्या गाववदेवीची जत्रा म्हणजे एकप्रकारचा उत्सवच आणी या जत्राची लोक वर्षभर आतुरतेने वाट भगत असतात. आणि या जत्रा येथील स्थानिक आपापल्या परिने साजऱ्या करतात. मात्र नवी मुंबईतील वाशी,सेक्टर २६ कोपरी गाव येथील ग्रामस्थानी या जुन्या सर्व परंपरा आणि रीति रिवाजाला बगल देत गावात एक आगल्या वेगळ्या प्रकारची जत्रा साजरी केलि जाते.येथील गावदेवी मंदिरात जत्रे ऐवजी कोपरी गाव ग्रामस्थकड़ून उत्सव सोहळा म्हणून साजरा केला जातो.दिनांक १७व १८एप्रिल रोजी हा वर्षपूर्ती सोहळा साजरा होणार आहे.त्यामधे रात्रि चे जागरण म्हणून “बायांची गाणी”हा विशेष कार्यक्रम असून यात गावदेवीची गाणी गायली जातात.आणि गावातील सम्पूर्ण महिला या मधे सहभागि होऊन गावदेवीचे जागरण करतात.दुसऱ्या दिवशी ग्रामसभेच्या मीटिंग मधे सोडत पद्धतीने ज्या जोड़प्यानचे नाव चिट्ठी मधे उतरले असते त्यांना श्री सत्यनारायण महापुजेचा बहुमान मीळतो आणि त्यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा घातली जाते.व सायंकाळी शुद्ध शाकाहारी महाभण्डारा जेवनाचा प्रसाद असतो.अश्या प्रकारे हा उत्सव कुठलाही मांसाहार न करता संपूर्ण शाकाहारी पद्धतीने गावदेवीचा वार्षिक सोहळा जत्रेप्रणेच कोपरी गावात साजरा केला जातो.