नवी मुंबई : नेरूळ गावातील महापालिका प्रभाग 95 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याकडून नेरूळमधील विद्यार्थ्यांकरिता 10 दिवस स्वस्त दरात वह्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नेरूळ सेक्टर 20 मधील प्लॉट सी/103, शांघाई हॉटेलजवळ असणार्या नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात 8 जून ते 17 जून या कालावधीत संध्याकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत स्वस्त दरामध्ये वह्याची विक्री करण्यात येणार आहे. नेरूळमधील गरीब व गरजू वर्गातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले आहे.