• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2017

नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नैना क्षेत्रातील गावांच्या पाण्यासाठी  कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना (NAINA) अंतर्गत येणाऱ्या 270 गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच कोंढाणे प्रकल्प हा पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

            नवी मुंबई प्रभावित अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प 644 वर्ग कि.मी. क्षेत्रावर राबवण्यात येणार असून या प्रकल्पात 270 गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी लागणारी सध्याची तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून कोंढाणे प्रकल्प ‘आहे त्या स्थितीत’ सिडकोकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पासाठी आजपर्यंत झालेल्या बांधकामाचे मूल्यांकन करुन हा खर्च सिडकोने कोकण पाटबंधारे महामंडळास द्यावयाचा आहे. तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या आवश्यक मान्यता घेऊन धरणाचे संकल्पन सिडकोने मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (नाशिक) यांच्याकडून करुन घ्यायचे आहे. या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था नेमण्याचे अधिकार सिडकोला असतील. कोंढाणे प्रकल्पातील एकूण 105.97 दलघमी पाणीसाठ्यापैकी 10.55 दलघमी पाणी शेतीसाठी वापरण्यास प्रचलित सिंचन दरानुसार होणारी पाणीपट्टीची रक्कम सिडकोला देण्याच्या अटीवर देण्याचे या निर्णयादरम्यान मान्य करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात यापूर्वी एसीबीमार्फत सुरु असलेली चौकशी कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही.

Previous Post

अनिवासी मालमत्ता कर न भरणार्‍या खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याची मनसेची मागणी

Next Post

वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

Next Post
वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या  एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

वाहन नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या एकरकमी मोटार वाहन करामध्ये वाढ

10 जुलै रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

10 जुलै रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन

महापालिका प्रशासनाने कामगारांना सानुग्रह अनुदानाबाबत सिडकोचा आदर्श घ्यावा

जुईनगर सेक्टर 24 परिसरात ट्री बेल्ट परिसरात वृक्षारोपणासह लगतच्या भुखंडावर उद्यान विकसित करण्याची काँग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com