सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वस्तूरुपात अनुदान न देता त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. दिनांक 05 डिसेंबर 2016 रोजीच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार ज्या ठिकाणी शासनाव्दारे वस्तुरुपात अनुदान देण्यात येत आहे, त्याठिकाणी वस्तुरुपात अनुदान देण्याऐवजी रोख रक्कमेच्या स्वरुपात लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ रक्कमेचे हस्तांतर करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभेत 30 मार्च 2017 रोजी मंजूरी प्राप्त झाली. हे करताना विद्यार्थ्याचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी जोडलेले असावे याकरीता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची आधारकार्ड काढण्यात आली व त्यांना बँक खाते सुरु करणेबाबत शालेय पातळीवरून मदतही करण्यात आली.

वस्तुरुपातील अनुदानाऐवजी बँक खात्यात त्या वस्तूंची रक्कम जमा करण्याच्या योजनेची माहिती प्रत्येक शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत पालकांची बैठक घेऊन प्रसारीत करण्यात आली. त्यास अनुसरून मागील सन 2016-17 शैक्षणिक वर्षातील वस्तूरुपातील अनुदानाऐवजी रोख रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. याकरीता विद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी करून त्याचे देयक शाळेत सादर केल्यानंतर त्या रक्कमेची प्रतिपूर्ती त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करून केली जाते. या योजनेमागे विद्यार्थ्यांना वेळेवर वस्तू मिळाव्यात, विद्यार्थी – पालकांच्या पसंतीने दर्जेदार मिळाव्यात तसेच या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी हा शासनाचा हेतू सफल होत आहे.
आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या 51 शाळांमधील पहिली ते आठवीच्या 17969 विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात 4 कोटी 89 हजार 901 इतकी रक्कम शिक्षण विभागामार्फत जमा करण्यात आलेली आहे व विद्यार्थी जसजशी वस्तु खरेदीची देयके सादर करतील त्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे. देयक अदा करण्यापूर्वी संबंधित पालक, मुख्याध्यापक, प्र. केंद्र समन्वयक, प्र. विस्तार अधिकारी, सहा. लेखाधिकारी यांनी स्वाक्षरी करून ते प्रमाणित केलेले असते.
या प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थी, पालकावर अमुक एका विक्रेत्याकडूनच खरेदी करावी अथवा अमुक एका दर्जाचीच खरेदी करावी असे बंधन घालण्यात आले नसून पालक वाटल्यास आपल्या विद्यार्थ्याकरीता उच्च श्रेणीचीही वस्तू खरेदी करू शकतात. तथापि त्यांना वस्तू रूपातील अनुदान रक्कम मात्र स्थायी समितीने निश्चित केलेलीच मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे वस्तू खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य संबंधित विद्यार्थी, पालकाला असल्याने व रक्कमही त्यांच्याच बँक खात्यात थेट जमा होत असल्याने ही प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आहे.
अशाचप्रकारे सन 2017-18 या विद्यमान आर्थिक वर्षामध्ये शैक्षणिक साहित्यापोटी विद्यार्थ्यांना रक्कम स्वरूपात अनुदान देण्याबाबत शिक्षण विभागामार्फत वर्तमानपत्रांतून जाहीर प्रकटन करण्यात आले असून स्थानिक व्यापारी संस्था, जिल्हा व राज्यस्तरीय व्यापारी संस्था, असोसिएशन यांना पत्रे पाठवून, मेल करून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सर्व वस्तुंची परिमाणे जाहीर करण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने कोणा एका पुरवठादाराची मक्तेदारी राहू नये, निकोप स्पर्धा व्हावी तसेच पालकांना आपल्या विद्यार्थ्यांकरीता दर्जेदार वस्तू योग्य किंमतीत उपलब्ध व्हाव्यात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे.
त्यामुळे शासन निर्णयानुसार तसेच स्थायी समितीने मंजूर केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ वस्तुरूपात न देता त्यांनी वस्तू खरेदी करून त्याचे देयक सादर केल्यानंतर रोख स्वरूपात त्यांच्या आधार लिंक बँक अकाऊंटला जमा करण्यात येत आहे व ही प्रक्रिया पूर्णत: पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील पालकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2017-18 करिता लवकरात लवकर शैक्षणिक वस्तू खरेदी करून त्याची प्रमाणित देयके शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिक्षण विभागास सादर करावीत जेणेकरून नियमानुसार त्याची प्रतिपूर्ती करणे महानगरपालिका शिक्षण विभागास शक्य होईल.