नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-18 येथील जलकिरण सोसायटी,पारिजात सोसायटी लगत असलेल्या एमएसईडीसीच्या सबस्टेशन परिसरात आणि सागरदर्शन टॉवर समोरील पद पथावर झाडांच्या फांद्या आणि नारळाच्या झावळ्या मागील 15 दिवसांपासून पडून होत्या.त्यामुळे सदर ठिकाणी डास,मछर यांची पैदास होवून मलेरिया,डेंगू यासारखे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी रवींद्र भगत यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून पदपथाची सफाई केली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पदपथावर पडून राहीलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रहीवाशांना साथीच्या आजाराची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिकांच्या मदतीसाठी रवींद्र भगत यांनी केवळ पालिका प्रशासनाकडे पाठपुरावाच केला नाही तर दोन दिवस स्वत: उपस्थित राहून संबंधित ठिकाणी स्वच्छताही करून घेतली. याप्रकरणी त्यांना विवेक पाटिल ,दामोदर लेंडे,टोनबा घोलप,संतोष वाफारे, दीपक जाधव, सत्यवान घाडी यांची मोलाची साथ मिळाली.