सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे 15 जुलै 2017 रोजी अर्बन हाटमध्ये वृक्षारोपण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडेच काही वनस्पती आणि पक्षी प्रेमींच्या गटाने सिडको अर्बन हाटच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन या परिसरात विविध फळांच्या व विविध प्रकारच्या वृक्षांच्या लागवडीची कल्पना सुचवली होती. ज्यामुळे येथे विविध प्रजातीतील पक्ष्यांची संख्या वाढेल व त्यांना हक्काचा निवारा मिळेल. सदर संकल्पनेतूनच वृक्षारोपण दिवस आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी वृक्ष लागवडीत रस असणार्यांना अर्बन हाटमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुक आंबा, जांभूळ, पेरु, चिकू यांसारख्या फळांच्या रोपांचे रोपण करु शकतात. निसर्गाच्या सानिध्यात तब्बल 12 एकरच्या परिसरात वसलेले सिडको अर्बन हाट विस्तृत आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध असून अर्बन हाटमध्ये 800 मीटरचा रस्ता आहे. त्याचप्रमाणे अर्बन हाटच्या दोन्ही ठिकाणी घनदाट जंगल असून त्यात दोन बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आली आहेत. यामघ्ये विविध प्रकारचे वृक्ष, विशिष्ट प्रजातीतील पक्षी, फुलपाखरे, कीटक यांचे हक्काचे घर तयार झाले आहे. महापालिकेच्या मदतीने अर्बन हाटमध्ये रिक्त जागेचा विकास करण्यात येणार आहे.
अर्बन हाट परिसरामध्ये दरवर्षी लाखो नागरिक भेट देत असून दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. येथे येणार्या अभ्यागत सिडकोतर्फे विकसित करण्यात आलेल्या अर्बन हाटच्या पर्यावरणस्नेही परिसराची दखल घेऊन त्याची प्रशंसा करतात.
वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी होणार्या इच्छुकांनी वृक्ष लागवडीच्या वेळापत्रकासाठी सिडको अर्बन हाट व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. बुकिंगसाठी सिडको अर्बन हाट व्यवस्थापक संपर्क- 959421169/02227561284