* प्रकल्पग्रस्त कामगारांना मिळणार न्याय * येत्या ८ दिवसात बैठक घेण्याचे कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांचे आदेश
सुजित शिंदे : 9619197444
मुंबई :- उरणमधील ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीमधील १३१ कर्मचाऱ्यांना कपातीचे कारण सांगून कमी करण्यात आले आहे.हे सर्व कर्मचारी प्रकल्पग्रस्त असून त्यांची जमीन संपादित करताना नोकरीचे हमीपत्र देण्यात आले होते. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांची भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीची मागणी बुधवारी (दिनांक १२ जुलै) केली.हि मागणी तात्काळ मान्य करीत कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांनी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे मालक आणि व्यवस्थापनासोबत येत्या ८ दिवसात बैठक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उरणमधील खाजगी कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना लढा देऊनच आपला रोजगाराचा हक्क मिळवावा लागत आहे. येथील ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीमध्ये २७ जून २०१७ रोजी १३१ प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावरून कमी करण्याच्या नोटीस देऊन कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व कामगारांना उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नाही. कोप्रोली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सदर जागेवर ऑलकार्गो लॉजिस्टिकचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जागा संपादित करताना येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे हमीपत्र देण्यात आले होते. मात्र अचानक कंपनी व्यवस्थापनाने येथील प्रकल्पग्रस्तांना कामावरून कमी करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याबाबत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांची ठराविक कामगारांसोबत भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीची मागणी लेखी निवेदन देऊन केली. हा विषय गांभीर्याने घेत कामगारमंत्री ना. संभाजी निलंगेकर पाटील यांनी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे मालक आणि व्यवस्थापनासोबत येत्या ८ दिवसात बैठक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत,कामगारनेते सुरेश पाटील,मोतीराम कोळी,रवी नाईक,कामगार प्रतिनिधी गिरीश म्हसे,अविनाश म्हात्रे,कृष्णकांत पाटील,कृष्णा ठाकूर,रुपेश म्हात्रे,मिलिंद पाटील हेसुद्धा उपस्थित होते.