नवी मुंबई : तुर्भे सानपाडा एमआयडीसीतील सँडोझ कंपनी मागील वर्षी बंद करण्यात आली.यावेळी कंपनीतील कायमस्वरुपी कामगारांना कंपनीकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले. मात्र कंपनीतील कंत्राटी कामगारांना कंपनीकडून कोणताच मोबदला देण्यात आला नाही.अनेकदा प्रयत्न करूनही कंपनीकडून कंत्राटी कामगारांना न्याय मिळत नव्हता. अखेरीस कंत्राटी कामगारांनी लोकनेते गणेश नाईक यांच्याकडे आपली कैफियत मांडली. लोकनेते गणेश नाईक यांनी ,श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉक्टर संजीव गणेश नाईक व श्रमिक सेनेच्या माध्यमातुन कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावला. कंपनीने कंत्राटी कामगारांना एक लाखां पासुन ते चार लाख तीस हजार रुपयांपर्यंत मोबदला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी लोकनेते नाईक यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले आहेत त्याच प्रमाणे सॅंडोझ कंपनीचे व्यवस्थापक हेमंत सुराणा आणि समीर कोरे यांचे देखील आभार मानले.