सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सिडको अग्निशमन विभागातर्फे 14 ते 20 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात 18 एप्रिल 2017 रोजी नवी मुंबईतील डि. ए. व्ही. च्या पाच शाळांमध्ये अग्निशमन सप्ताहाविषयी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा 13 जुलै 2017 रोजी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर व मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके उपस्थित होते.
आजची पिढी हे उद्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यास योगदान देणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक जबाबदार नागरीक बनणं अत्यावश्यकआहे. स्वार्थी, आत्मकेंद्री स्वभाव सोडून देऊन सामाजिक अपप्रवृत्तींचा नाश केला पाहिजे व एक चांगला महाराष्ट्र व चांगला भारत बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीले पाहिजे असे उद्गार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांनी या प्रसंगी काढले.
आपण समाजाला काय देतो, या गोष्टीचे भान आजच्या तरूण पिढीने सातत्याने राखणे अत्यावश्यक असल्याचे मत मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी व्यक्त केले. या निबंधलेखन व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून सिडको महामंडळाने विद्यार्थ्यांना त्यांची मतं व विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते, ज्याचा या सर्व विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग केला आहे. या पिढीमार्फत हे विचार व ही मत समाज बांधणीसाठी अवलंबण्यात आल्यास देशाची प्रगती निश्चित असल्याचेदेखील त्यांनी व्यक्त केले.
इयत्ता 6 वी, 7 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी मी अग्निशमन अधिकारी झालो तर व इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी व 12 च्या विद्यार्थ्यांना आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – अग्निशामक असे विषय देण्यात आले होते. तर चित्रकलेसाठी इयत्ता 6 वी, 7 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांना अग्नि सुरक्षित स्वयंपाकगृह व इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी व 12 च्या विद्यार्थ्यांना आग लागलेली शाळेची बस व मुलांचे प्राण वाचवणारी हुशार मुले असे विषय देण्यात आले होते.
निबंधलेखन स्पर्धेसाठी 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थी गटामध्ये कु. शर्वरी पाटील, इयत्ता 8वी, डि. ए. व्ही. शाळा (ठाणे) हीला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम रू. 3000 व प्रशस्तिपत्रक), कु. श्लोका शेट्टी, इयत्ता 8वी, डि. ए. व्ही. शाळा (ऐरोली) हीला द्वितीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 2000 व प्रशस्तिपत्रक) व कु. हरगुनित कौर, इयत्ता 7वी, डि. ए. व्ही. शाळा (ठाणे) हीला तृतीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 1000 व प्रशस्तिपत्रक) देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थी गटामध्ये कु. जया वर्मा, इयत्ता 10 वी, डि. ए. व्ही. शाळा (नेरूळ) हीला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम रू. 3000 व प्रशस्तिपत्रक), कु. शैलजा झा, इयत्ता 10 वी, डि. ए. व्ही. शाळा (खारघर) व कु. निकीता हिशीकर, इयत्ता 10 वी, डि. ए. व्ही. शाळा (पनवेल) यांना विभागून द्वितीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 2000 व प्रशस्तिपत्रक) व कु. समृद्धी सेनगुप्ता, इयत्ता 9 वी, डि. ए. व्ही. शाळा (ऐरोली) हीला तृतीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 1000 व प्रशस्तिपत्रक) देऊन सन्मानित करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेसाठी 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थी गटामध्ये कु. हर्षिणी अय्यर, इयत्ता 8वी, डि. ए. व्ही. शाळा (ठाणे) हीला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम रू. 3000 व प्रशस्तिपत्रक), कु. मुस्कान फोफालिया, इयत्ता 7 वी, डि. ए. व्ही. शाळा (ऐरोली) हीला द्वितीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 2000 व प्रशस्तिपत्रक) व कु. स्वर्णाली चक्रवर्ती, इयत्ता 7वी, डि. ए. व्ही. शाळा (पनवेल) हीला तृतीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 1000 व प्रशस्तिपत्रक) देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थी गटामध्ये कु. अभिप्सा साहू, इयत्ता 12 वी, डि. ए. व्ही. शाळा (पनवेल) हीला प्रथम पारितोषिक (रोख रक्कम रू. 3000 व प्रशस्तिपत्रक), कु. विदिशा कुमार, इयत्ता 10 वी, डि. ए. व्ही. शाळा (पनवेल) हीला द्वितीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 2000 व प्रशस्तिपत्रक) व कु. स्वयम सातोपे, इयत्ता 9 वी, डि. ए. व्ही. शाळा (नेरूळ) याला तृतीय पारितोषिक (रोख रक्कम रू. 1000 व प्रशस्तिपत्रक) देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे शिक्षक व मुख्याध्यापकदेखील उपस्थित होते. वितरण सोहळ्या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जारूकता निर्माण व्हावी या हेतून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना एक रोपटे देण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य दक्षता अधिकारी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी कु. प्रिया रातांबे यांनी केले.