सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : ठाणे शहरातील हायवे पूर्व दुतगती महामार्गावरील धोकादायक झालेल्या कोपरी पुलाच्या संत गतीने सुरु असलेल्या कामाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करून सभागृहचे लक्ष वेदले या धोकादायक झालेल्या पुला संदर्भात रेल्वे ने या पुलावरील वाहतुक बंद करून वाहने दुसरीकडून वळवावे असे पत्र महापालिका आयुक्त, सर्वजनिक बांधकाम विभाग, एम् एम् आर डी ए, वाहतुक पोलिस उपयुक्त यांना कळविले असून सुद्धा प्रशासनाने या कड़े दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही बाब गंभीर असून कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सर्व प्रथम या पुलाची डागडूजी सुरु करून नविन पुलाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी असे आदेश एम् एम् आर डी ए ला दिले. तसेच ठाण्यातील ऐतिहसिक असलेल्या बी जे हायस्कूल च्या इमारतीचे काम अतिशय संत गतीने सुरु असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर खासदार राजन विचारे यांनी मी आमदार असताना या इमारतीच्या कामाला १४ कोटी रुपयेची मंजूरी मी शासनाकडून मिळवुन आणली अत्ता ३ वर्षे होउन सुद्धा या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.त्यानी त्या वेळी केली त्यावर विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्फ़त या कामाची चौकशी करण्यात येइल असे आश्वासन दिले. तसेच आमदार व् खासदार निधितुन दिलेल्या गरजू शाळांना संगणकाचा पुरवठा त्वरित करण्यात येत नसल्याने याची विचारना केली असता नुकताच निविदा काढण्यात आल्या असे उत्तर त्यावेळी देण्यात आले.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील प्र. क्र. ३० घनसोली गाव से. १५ ते २१ येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून यांना जोडनारा ३० मिटर चा रस्ता करने बाकि असून या ठिकाणी अस्तित्वातिल असलेला पुल धोकादायक झाल्याने तो कोणत्याही क्षणी ढासळू शकतो व् दुर्घटना होउन दोन्ही गावांशी सम्पर्क तूटु शकतो. हा जवळचा एकमेव रस्ता असल्याने यासाठी महापालिकेने या पुलाच्या बांधकामा पोटी ३ कोटीची मान्यता ही दिली आहे. परन्तु यातील काही भाग कांदळवन च्या विभागाशी येत असल्याने ते महापलिकेस काम करून देत नसल्याने खासदार विचारे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश वन विभागास व् महापालिका उपयुक्त यांना दिले. तसेच वन विभागाच्या हद्दीत येणारी दीघा येथील रेल्वेने बांधलेल्या ऐतिहसिक हिलटन पाडा येथील डॅम ची ऊँची वाढवून ते पाणी पिण्यायोग्य करून तेथील परिसरातील नागरिकाना देण्यात यावे त्या जागेला पर्यटन क्षेत्र करून त्याचा विकास करावा अशी मागनी खासदार विचारे यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी या कामासाठी ५० कोटी ची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच मीरा भाइंदर येथील क्लस्टर योजना लवकर लागु करावी अशी मागणी खासदार राजन विचारे व् आमदार प्रताप सरनाईक यांनी केली त्यावेळी पालक मंत्री महोदय यांनी इतर महापालिकेच्या अधिकार्यांना ठाणे महापालिकेने ज्या प्रमाने तातडीने धोकादायक इमारतींचा सर्वे करून शासनस सादर केला. व् त्याला मंजूरी मिळविली त्याप्रमाणे तुम्ही ही करावे असे आदेश त्यावेळी देण्यात आले.
या बैठीकीला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे , श्रीकांत शिंदे ,कपिलपाटील ,आमदार प्रताप सरनाईक ,सुभाष भोईर ,किसान कथोरे , गणपत गायकवाड ,ज्योती कलानी , नरेंद्र पवार , निरानन डावखरे ,रवींद्र फाटक ,कल्याण महापौर व इतर प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते