नवी मुंबई : नेरूळ येथील सेक्टर 6, दर्शन दरबार लगत असणार्या रस्त्यावर वृक्षाची फांदी पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मनपाने वृक्ष छाटणी योग्य प्रकारे केली नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भविष्यात वाईट घटना होऊ नये त्यासाठी मनपाने नेरूळ परिसरातील वृक्ष छाटणी करावी अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख दिलीप आमले यांनी केली आहे.
शनिवारी सकाळी 12 च्या सुमारास नेरूळ सेक्टर 6 येथील रस्त्या लगत असणार्या झाडाची फांदी रस्त्यावरच कोसळली. रस्त्यालगतच एका युवकाने आपली दुचाकी उभी केली होती. त्या दुचाकीचे नुकसान झाले. त्या तरुणाचे नशीब बलवत्तर म्हणून फांदी कोसळण्याच्या वेळेला तो आपली दुचाकी आला नाही.नाहीतर त्याच्या जीवावर बेतले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असणारे शिवसेना शाखाप्रमुख आमले यांनी सांगितले.
मनपा वृक्ष छाटणीची कामे तात्पुरत्या स्वरूपाची कामे करत आहे.हे योग्य नसून एखाद्यावर वाईट प्रसंग येऊ शकतो म्हणून योग्य दखल घेऊन नागरी कामे करावीत अशी मागणी नागरिक करत आहेत.
वृक्षाची फांदी रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यावेळी वाहतूक पोलीस व मनपाचे कर्मचारी वेळेत हजर झाल्याने फांदी रस्त्यावरून काढून टाकली व रस्ता पूर्ववत करण्यात आला.
या बाबत उद्धान अधिकारी प्रकाश गिरी यांना विचारले असता,आम्ही वृक्ष छाटणी नियमित करत आहोत, चुकून राहिली असतील तर लगेच छाटणी करतो असे सांगितले.
प्रभागात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास आपला माणूस अशी जनसामान्यात प्रतिमा असणारे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले मदतीला धावून जातात, आज त्याचाच पुन्हा एकवार नेरूळ सेक्टर सहामधील जनतेला प्रत्यय आला.