सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी युवा सेनेचे बेलापुर उपविधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी नेरूळ रेल्वे स्टेशन प्रबंधकांकडे एका लेखी निवेदनातून (सोमवारी, दि. 17 जुलै) रेल्वे स्थानकात वॉटर वेडींग मशिन बसविण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईतील सर्वात मोठ्या वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी नेरूळ रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नेरूळ रेल्वे स्थानकावरून प्रवासी ये-जा करत असतात. या स्थानकात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वांचीच गैरसोय होत आहे. समस्येचे गांभीर्य व रहीवाशांची गरज लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी वॉटर वेडींग मशिन बसविण्याची मागणी निखिल रतन मांडवे यांनी केली आहे.