नवी मुंबई : दरवर्षी नवी मुंबई प्रेस क्लब तर्फे आयोजित करण्यात येणारा शासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी व पत्रकार यांच्यातील संवाद कार्यक्रम शुक्रवार वाशीतील रघुलीला आर्केड येथे संपन्न झाला. यावेळी सिडको, नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस, कोकण महसुल विभाग, कोकण रेल्वे, पनवेल महापालिका, एकात्मिक बालविकास, पनवेल व वाशी आरटीओ, महावितरण, एपीएमसी, एनएमएमटी आदी शासकीय व निमशासकीय अधिकाऱयांनी उपस्थित राहून नवी मुंबई शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले.
सन 2011 मध्ये स्थापन झालेल्या नवी मुंबई प्रेस क्लब तर्फे पत्रकारांच्या विविध प्रश्नांसोबत शहर विकासावर भर देतानाच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेली 7 वर्ष नवी मुंबई शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारे सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस, कोकण रेल्वे, आरटीओच्या उच्चपदस्थ अधिकाऱयांबरोबर अन्य अधिकाऱयांना एकत्रित बोलावून शहरांच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येते. नवी मुंबई प्रेस क्लब तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या संवाद कार्यक्रमाचे हे 7 वे वर्ष होते. शुक्रवार 14 जुलै रोजी सायंकाळी वाशी येथील रघुलिला आर्केडमधील इंम्पीरियल बॅन्क्वेट येथे हा संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, कोकण विभागीय महसूल आयुक्त जगदीश पाटील, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एम, कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता, एकात्मिक बाल विकास विभागाचे आयुक्त कमलाकर फंड, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, नितीन पवार, तुषार दोषी, राजेश बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील, किशन जावळे, तावडे, पनवेल आरटीओचे लक्ष्मण दराडे, महावितरणचे विभागीय संचालक सतीश करपे, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे, तळोजा कारागृहाचे उपअधिक्षक सदानंद गायकवाड तसेच सिडको, पोलीस, महापालिका, महावितरण, महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या विविध शासकीय आणि पोलीस प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱयांनी शहर विकासात अडथळे ठरणाऱया प्रश्नांची आणि समस्यांची योग्यरितीने सोडवणूक करण्यासाठी शहरामधील सर्वच शासकीय प्राधिकरणांचा समन्वय आवश्यक आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई प्रेस क्लबद्वारा गत सात वर्षांपासून संवाद …अधिकाऱयांशी हा उपक्रम राबविला जात असल्याचे नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक अधिकाऱयांनी गाणी, कविता, शायरी, किस्से आदी आपले कलागुण सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र पाटील, विक्रम गायकवाड, नंदकुमार ठाकूर, मनोज पाठक व स्वाती नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.