– लोकनेते गणेश नाईक यांची महापौर सुधाकर सोनावणे यांना सूचना
नवी मुंबई : ऊन, वारा आणि पावसापासून इमारतीचे रक्षण व्हावे यासाठी शहरातील अनेक सोसायटयांनी त्यांच्या गच्चीवर गरजेपोटी वेदरशेड उभारल्या आहेत. मात्र या वेदर शेडना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
या सोसायट्यांमधून राहणार्या नागरिकांनी या वेदरशेड नियमित करण्यासाठी लोकनेते गणेश नाईक यांना साकडे घातले आहे. लोकनेते नाईक यांनी या विषयी महापौर सुधाकर सोनावणे यांच्याशी चर्चा करून वेदरशेड नियमित करण्याचा ठराव पालिकेच्या आगामी महासभेत मांडून तो मंजूर करून राज्य शासनाच्या पुढील मंजुरीकरिता पाठविण्याची सूचना महापौरांना केली आहे. त्यामुळे या वेदरशेड नियमित करण्याची प्रक्रिया पालिका स्तरावर लवकरच सुरु होऊन हजारो सोसायट्यांमधून राहणार्या लाखो राहिवाश्याना दिलासा मिळणार आहे. ऊन, वारा आणि पावसापासून इमारतीचे रक्षण व्हावे यासाठी शहरातील अनेक सोसायटयांनी त्यांच्या गच्चीवर गरजेपोटी वेदरशेड उभारल्या आहेत. सिडको आणि खाजगी विकसकांनी या इमारती बांधल्या आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सिडकोच्या इमारती मोडकळीस आल्या असून त्यामधून गळती होते आहे. इमारतींच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील जुन्या इमारतीची अशीच अवस्था आहे. या वेदर शेडचा सोसायट्या कोणताच व्यावसायिक वापरही करीत नाहीत. मात्र विकास नियंत्रण नियमावलीत वेदर शेडना परवानगी नसल्याने त्यांच्या कायदेशीर वैधतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चारही बाजूने मोकळ्या असलेल्या वेदर शेड नियमित करण्यासाठी प्रथम पालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठवावा, अशी सूचना लोकनेते नाईक यांनी महापौर सोनावणे याना केली आहे. महापौर सोनावणे यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता लोकनेते नाईक यांनी वेदरशेड नियमित करण्यासाठी पालिका महासभेत प्रस्ताव आणण्याची सूचना केल्याचे सांगून तसा प्रस्ताव लवकरच आणण्यात येईल, अशी माहिती महापौर सोनावणे यांनी दिली.