उपमहापौर चारुशीला घरत यांची ग्वाही
पनवेल :- प्लास्टिक कचऱ्याचे विघटन हि जागतिक समस्या आहे. प्लास्टिकमुक्त पनवेल हा रोटरीचा आणि एस आर जोशी मेमोरियल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला पनवेल महानगरपालिकेची सुद्धा साथ लाभेल अशी ग्वाही उपमहापौर चारुशीला घरतयांनी नवीनपनवेल येथे दिली. संत साईबाबा विद्यामंदिर मध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सन राईज आणि एस आर जोशी मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लास्टिक मुक्त अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शाळांमध्ये महानगरपालिकेमार्फत प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी ड्रम देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्लास्टिकचा पुनर्वापर हि काळाची गरज आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील ६० टक्के कचरा हा प्लास्टिक असतो. या कचऱ्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष दिवंगत एस आर जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल तालुक्यातील उसर्ली येथे एस आर जोशी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने प्लास्टिक रिसायकलिंग प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाला बढावा देण्यासाठी तसेच शाळकरी मुलांमध्ये प्लस्टिकच्या दुष्परिणामांची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सन राईजने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (दिनांक १९ जुलै) नवीन पनवेल मधील संत साईबाबा विद्यामंदिर मध्ये या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला. यामध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे,आहे त्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे याबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पनवेल मनपाच्या उपमहापौर चारुशीला घरत ,डॉ अनिल परमार आणि सुनीता जोशी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरीच्या वतीने या शाळेमध्ये इ लर्निग किट देण्याचे डॉ अनिल परमार यांनी यावेळी जाहीर केले. उपमहापौर चारुशीला घरत यांनी प्लास्टिक एकत्र करण्यासाठी ड्रम देण्याचे कबूल केले. सुनीता जोशी यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उसर्लीच्या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रोटरी क्लब ऑफ पनवेल सन राईजचे अध्यक्ष मदन बडगुजर यांनी सांगितले कि,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी ची घोषणा केली आहे;राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मार्ट व्हिलेज चा नारा दिला आहे त्यामुळेच आम्ही स्मार्ट सोसायटी हा प्रकल्प हाती घेत आहोत. कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,वृक्षारोपण,सोलर एनर्जी,रेन वॊटर हार्वेस्टिंग अशी कामे येत्या काळात रोटरी क्लब ऑफ सनराईज घेणार आहे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शैलेंद्र अक्कलकोट,मुख्याध्यपिका श्रीमती उरणकर,डॉ. खोत,डॉ. कुलकर्णी,बाळकृष्ण आंबेकर,शिवाजी दुर्गे,पत्रकार बाबुराव खेडेकर,दीपक घोसाळकर आदी मान्यवर आणि शिक्षक वृंद सुद्धा उपस्थित होते.