मुंबई : जामखेड नगरपरिषदेत सत्तांतर झाले असून विद्यमान नगराध्यक्ष प्रीती विकास राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे, 17 नगरसेवक पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेत, त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिंदे यांच्या हातात आल्या आहेत.
दीड वर्षा पूर्वी जामखेड नगरपरिषदेत सुरेश धस यांचा पॅनल सत्तेवर आला होता, पण या पॅनलच्या नगराध्यक्षा राळेभात यांच्या मनमानी आणि निःक्रिय कारभाराला नगरसेवक आणि जनता कंटाळली होती, त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आला, आता 17 नगरसेवक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आहेत. त्यामुळे जामखेड मध्ये पालक मंत्री गटाची सत्ता येणार हे उघड झाले आहे,
गेल्या दीड वर्षांत जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे, पाणी, रस्ते हे प्रश्न सुरेश धस यांच्या सोबतच्या लोकांना सोडवता आले नाहीत, सर्वपक्षीय नगरसेवक पालक मंत्री प्रा. शिंदे यांना विकासासाठी साकडे घालत असत, आता हे 17 नगरसेवक पालकमंत्र्यांच्या सोबत आल्याने पालकमंत्री ठरवतील त्याप्रमाणे शहराचा विकास होणार आहे, त्यामुळे जामखेड करांच्या मनात अच्छे दिनाच्या अशा पल्लवित झाल्या आहेत, कर्जत – जामखेड हा शिंदे यांचा मतदार संघ आहे, या मतदार संघात त्यांनी विकासकामांसाठी आजपर्यत विक्रमी निधी आणला आहे,त्याचा लाभ आता जामखेड ला मिळेल.