स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्थानकालगत पूर्वेला असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मॉसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नामफलकाची दुरावस्था झालेली होती. अक्षरे गळून पडली होती. यावर युवासेनेचे बेलापुर विधानसभा उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. युवा सेनेच्या आंदोलनाच्या केवळ इशार्यापुढे महापालिका प्रशासन नमले आणि अवघ्या काही दिवसातच रूग्णालयाच्या नामफलकाची महापालिका प्रशासनाने डागडूजी केली.
मॉसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय असे या महापालिकेच्या रूग्णालयाचे नाव आहे. या रूग्णालयावर तसा नामफलकही होता. काही दिवसापूर्वीच या नामफलकावरील ठाकरे रूग्णा ही नावे गळून पडली होती. ही बाब युवा सेनेचे पदाधिकारी निखिल रतन मांडवे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पालिका प्रशासनाकडे धाव घेत लेखी निवेदन सादर केले. मॉसाहेब मिनाताई ठाकरे हे आम्हा लक्षावधी शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असून यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात असल्याची नाराजी निखिल रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनापुढे व्यक्त केली. आठवडाभराच्या आत नामफलकाची दुरुस्ती न झाल्यास रूग्णालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा निखिल रतन मांडवे यांनी दिला. संततधार पाऊस असतानाही युवा सेनेच्या इशार्याची दखल घेत पालिका प्रशासनाने रूग्णालयाच्या नामफलकात दुरूस्ती करत नामफलक पूर्ववत करत तसे पत्रही निखिल मांडवेंना सादर केले.