स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
पनवेल : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्टला वाढदिवस असून यावर्षीही त्यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी, होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यात येऊ नयेत, त्याऐवजी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दि. ०६ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. त्याच्या आद्ल्यादिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आहे. यावेळी अभिष्टचिंतनासाठी येणारया पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक व मित्र परिवार यांनीही पुष्प गुच्छ, हार – तुरे आणू नये. ज्यांना यावर खर्च करायचा आहे त्यांनी तो निधी शेतकरीवर्गासाठी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आहे, त्या कर्जमाफीसाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी (CM Farmers Relief Fund) खाते क्रमांक ३६९७७०४४०८७, आयएफएससी कोड क्रमांक SBIN००००३००, मुंबई शाखा या नावाने शासनाचे जे स्वतंत्र खाते उघडले आहे, त्या खात्यात धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीने आपले योगदान द्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.