स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई :- आजच्या परिस्थितीत देशाच्या सीमेवर दररोज आमचे दोन जवान शहीद होत आहेत. जे देशासाठी प्राण देतात, ते खरोखर आमचे भगवान आहे. त्या करीता प्रत्येकांनी सिमाभागात जावून यात्रा करून आल्यास भारतमातेविषयी त्यांच्यात प्रेम जागृत होऊ शकते. दिवसरात्र सैनिक तैनात असताना सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्याची खंत विश्व हिंदू परिषदचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केली.
वाशी येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात कारगिल विजय दिवस हा जम्मु काश्मीर डोगरा समाज ट्रस्ट व अंत्योदय प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणुन बोलत होते. कारगिल युध्दातील साक्षीदार जवान महेंद्रसिंग यादव, हरपालसिंग बिष्ट, समशेरसिंग मेहरा, गोपालदत्त जोशी, गोपालसिंह रवतारा, सुरेशचंद्र, उमेश डिगरा या सात रत्नाचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर काश्मीरी पंडीत फ्रंटच्या अध्यक्षा श्रीमती शक्ती मुन्शी, जम्मु काश्मिर डोगरा समाज ट्रस्टचे कृष्णा पंडीत, अंत्योदय प्रतिष्ठानचे सतिश निकम, नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सुभाष कुळकर्णी, अमृत प्रेरणा, महाविर इंटरनँशनलचे टी.सी.बाफणा, कच्छ युवक संघाचे राहुल देडीया, राजस्थान राजपूत परिषदचे उदयविर सिंह आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मेरा रंग दे बंसती चोला या गीताने झाली. शंकर गायकर पुढे म्हणाले की, आमचे जवान सदैव सिमेवर तैनात असतात. खरोखर सैन्यात जाण्यासाठी भाग्य लागते आणि सैनिकाला कुठलाही जात धर्म नसतो, तो फक्त राष्ट्रप्रेमी असतो. मात्र आंतकवादीला कुठला धर्म असतो, मात्र त्याला जाळताना धर्माची आठवण येते असा सवाल करून काश्मिरमध्ये तैनात असलेले सैन्य काढले तर काश्मिर हा काश्मिर राहणार नाही. आपल्याच देशातील राजकारण्यांनी देशाचे विभाजन केले आहे. म्हणूनच बजरंग दलाचे पाचहजार देशभक्त लवकरच घाटीला जाणार आहे. त्यामुळे जे आंतकवादी दगड मारीत आहेत, त्यांना आम्ही घाबरत नाही. ही आमची धरती आहे. तिथे असलेल्या डोगरा समाजाचे भारतावर मोठ्या प्रमाणात उपकार आहे. त्याकरीता प्रत्येक घरातून एक मुलगा हा सैन्यात गेला पाहीजे असे आवाहन करून ज्या वेळी सीमेवर तणाव निर्माण होतो, त्यावेळी माझे रक्त सळसळते. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रमातेविषयी असलेले प्रेम हे जागृत झालेच पाहीजे. जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी असा मनात राष्ट्राभिमान जागा झाला तरच हा कसाईखाना थांबणार असल्याचा विश्वास व्यक्त करून कारगिल युध्दाच्या काळात शेरीफ हा शेरीफ राहलाच नाही. मात्र आमचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अटलच राहीले म्हणूच आपण सर्व कारगिर विजय दिवस साजरा करीत आहोत. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्रीमती शक्ती मुश्रनी बोलताना म्हणाल्या की, जम्मु काश्मिर हा काही जमिनीचा तुकडा नाही. ते एका जमिनीच्या तुकड्याकरीता लढाई करीत आहे. मात्र आम्ही अस्तिवासाठी लढाई लढत आहे.जेहादच्या नावाने षंडयंत्र हे पुर्वीपासुन चालू आहे. आमच्या दरवाज्यावर धोका आहे हे आम्ही सर्वानी विसरता कामा नये. असे हे मुश्रनी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा पंडीत यांनी सांगितले की, जे आज काश्मिरमध्ये दगड मारत आहे. त्यांनी यापुढे सांभाळून राहावे, त्यांना उत्तर देण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. सतिश निकम म्हणाले की अशा लोकांना सडतोड उत्तर देण्याची खरी गरज आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जोशी यांनी केले.