नवी मुंबई: कार्ला गडावर भरणार्या एकविरा देवीच्या यात्रेत नवी मुंबईतील जुईनगर येथील गांवदेवी युवा मित्र मंडळ तफे स्वछता अभियान राबविण्यात आले. गांवदेवी युवा मित्र मंडळचे अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली 150 तरुणांनी रविवार, दि. 30 जुलै रोजी स्वछता अभियान मध्ये सहभाग नोदंवित समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
लोणावळा येथील कार्ला गडावरील एकविरा देवी संबंध आगरी-कोळी समाजाचे दैवत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे एकविरा देवी मंदिरमध्ये भाविकांची नेहमीच दर्शनासाठी रिघ लागलेली असते. संपूर्ण महाराष्ट्रातून आगरी-कोळी बंधू-भगिनीसह इतर धर्मीय भाविक एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, एकविरा देवीच्या दर्शनासाठी येताना सोबत घेऊन येणार्या प्लास्टिक वस्तू, प्लेट्स, चहाचे कप, ग्लास, वाट्या, पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे या वस्तू भाविक एकविरा देवी गडावर टाकतात. त्यामुळे एकविरा देवी गडावर आणि गड परिसरात कचर्याचे प्रमाण वाढते, अशी माहिती गांवदेवी युवा मित्र मंडळचे अध्यक्ष शैलेश भोईर यांनी दिली.
आपण आपले घर स्वछ ठेवण्यात नेहमीच भर देत असतो त्याच धर्तीवर आपल्या आराध्य दैवतांचे घर, आंगण साफ ठेवणे प्रत्येकाचे दायित्व आहे, या उद्देशाने शैलेश भोईर यांनी एकविरा देवी गड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले. त्यास नवी मुंबईतील तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकविरा देवी गड परिसरातील स्वच्छता अभियानमध्ये कोपरी गावातील तरुण अक्षय ठाकूर, तेजस भोईर, शुभम ठाकूर, नितीन ठाकूर, भावेश म्हात्रे यांच्यासह जवळपास 150 पेक्षा अधिक तरुणांनी सहभाग नोंदविला. गांवदेवी युवा मित्र मंडळ तर्फे यापुढे देखील एकविरा देवी गडावर सातत्याने स्वछता अभियान राबविण्यात येणार आहे, असे शैलेश भोईर यांनी आवर्जून सांगितले.