दिपक देशमुख
नवी मुंबई : भारत व चीन या दोन देशातील सीमेवरील परिस्थिती पाहता प्रत्येक भारतीय चीन विरोधात सध्या दिसून येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे येत्या सोमवारी रक्षा बंधन आहे. या सणानिमित्त लाखो भगिनी चिनी बनावटीच्या राख्या विकत घेत असतात. परंतु या राख्यांना तिलांजली देत भारतीय बनावटीच्या राख्या खरेदी करताना महिला दिसत आहेत. दरम्यान, स्वदेशी राख्यांचा भाव कडक असतानाही भगिनी त्याच राख्या घेण्यास पसंती देत आहेत. यामागे त्यांची देश भावना प्रखर दिसून येत आहे.
7 ऑगस्ट रोजी बहीण भावांचा पवित्र सण म्हणजे रक्षा बंधन आहे. या वेळी आपल्या भावाचा मनगट सुंदर दिसावा म्हणून बहिणी आकर्षक अशा चिनी राख्यांना आजतागायत राख्यांना पसंती देत होत्या. परंतु आपल्या सीमेवर आमच्या भावांच्या विरोधात चिनी सैनिक त्रास देत असताना आम्ही चीनची अर्थव्यवस्था चांगली होईल अशा वस्तू आम्ही राख्या खरेदी का कराव्यात असा प्रश्न अनेक बहिणी सवाल विचार आहेत.
महिला वर्गाचा कल स्वदेशी राख्यांकडे असल्याने व्यापारी वर्गानेही भारतीय बनावटीच्या राख्या आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. जरी या राख्यांची किंमत कमीतकमी दहा रुपये ते वीस, तीस, चाळीस, पन्नास रुपये असले तरी एक रुपाया कसा वाचवावा असा विचार करणार्या भारतीय महिला जास्त दर देऊन राख्या खरेदी करत आहेत. यावरून त्यांची देशभक्ती प्रकर्षाने जाणवत आहेत.
चिनी राख्या घेण्याविषयी महिलांनी आपल्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये दर्शना देशमुख या महिलेने सांगितले की, आपल्या मुळे जर आपला दुश्मन असणारा चीन श्रीमंत होत असेल व त्याच पैशाचा वापर आपल्या देशाच्या विरोधात करत असेल तर का घ्यायच्या त्यांच्या वस्तू असा प्रश्न विचारला आहे. 45 वर्षीय सुजाता कांबळे यांनी सांगितले कि,राख्याच नव्हे तर चिनी मोबाईल व इतर कोणतीही आकर्षक वस्तू असो आपण खरेदी करूच नये अशी शप्पथच प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. सुनीता सोमवंशी म्हणाल्या की, आमच्या कडे पैसा नसेल तर आम्ही आमच्या बांधून धागा बांधू, पण चिनी राख्या खरेदी करणार नाहीत असे उद्वेगाने सांगितले. अर्चना भगत या महिलेने सांगितले की,आमचे बंधू सीमेवर आम्हा भारतीयांचे रक्षण व्हावे म्हणून दिवस रात्र डोळ्यात तेल घालून दुश्मनांचा खात्मा करत असताना आम्ही चीन सारख्या दुश्मन देशाच्या राख्या का खरेदी करावेत असा सर्वच महिला भगिनींनी विचार करून चीनच्या सर्वच मालावर बहिष्कार घालावा असे आवाहनच केले आहे.