• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2017

खारघर बारप्रकरणी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
संघर्षच्या तक्रारीवरून कोकण उपायुक्तांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र
पनवेलः खारघर येथील रॉयल ट्युलिप बारला दिलेल्या परवानगीची चौकशी करण्यासाठी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागीय उपायुक्त (सामान्य) शिवाजी कादबाने यांनी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना दिले आहेत.
खारघर येथील वादग्रस्त रॉयल ट्युलिप बारची परवानगी रद्द करावी तसेच बेकायदा दिलेल्या परवानगीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी महत्वाची मागणी पनवेल संघर्ष समितीने यापूर्वी कोकण विभागाचे आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार उपायुक्त शिवाजीराव कादबाने यांनी संघर्षच्या मागणीची दखल घेवून चौकशीसाठी चक्रे फिरवली आहेत. 
कादबाने यांनी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना कार्यालयीन आदेश बजावत खारघर येथील ट्युलिप बारच्या परवानगीबाबत 15 दिवसात अहवाल सादर करावा, असे म्हटले आहे. संघर्ष समितीने याबाबत तक्रार केल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, याप्रकरणी संघर्ष समितीने राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त अश्‍विनी जोशी यांना पाठविलेल्या पत्रानुसार त्यांनीही खातेनिहाय चौकशीचे आदेश बजावून अहवाल मागविला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन खात्याचे उपायुक्त सावंत यांनी संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
रॉयल ट्युलिप बार मालकाने कायदा वाकवून बार सुरू ठेवला आहे. कायद्यातील खाचखळगे बारकाईने लक्षात घेवून त्यांनी बार वाचविला आहे. त्याधर्तीवर पनवेलमधील राज्य व केंद्रीय महामार्गावरील अनेक बार मालकांनी युक्तीवाद करत बारला परवानगी मिळावी, म्हणून पनवेल उत्पादन शुल्ककडे अर्ज केले आहेत.
दरम्यान, पनवेल -माथेरान महामार्ग अस्तित्वात असतानाही त्यालगत नव्या चार बारना नवीन पनवेल येथे परवानगी दिल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची खिल्ली उडववली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नवीन पनवेल-माथेरान मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा असतानाही पनवेल उत्पादन शुल्क खात्याने नव्या बारना परवानगी दिल्याने सावळागोंधळ सुरू आहे.
Previous Post

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

Next Post

नवी मुंबईकरांसाठी वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करावेत

Next Post
घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

नवी मुंबईकरांसाठी वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करावेत

घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

सवलतीच्या दरात भूखंड घेतलेल्या रुग्णालयांना सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारकच

थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

बेळगाव सिमावासियांबाबत सरकार गंभीर आहे का?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com