स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
ठाणे : राज्यभरात चौफेर दौडू लागलेला भाजपचा विजयी वारू रोखण्याच्या अभद्र इराद्याने एक झालेल्याविरोधकांना निपटून काढण्यासाठी पुढे सरसावलेले मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या पाठीशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ उभे केले आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या किमान दोन सभांचे नियोजन करण्यात येत असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बाबूल सुप्रियो आणि दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठमंत्रीही मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.
देशात, राज्यात आणि राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप सत्तेत असतानाच मीरा भाईंदरमध्येही एकाहाती विजय मिळवण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकभाजपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्याप्रचारातील सहभागामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. एकिकडे राज्यभरात होणार्यानिवडणुकांमध्ये एकापाठोपाठ विजय संपादन करत असलेल्या भाजपाला मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पनवेलआणि कल्याण डोंबिवली या महानगर प्रदेशातही चांगले यश मिळाले आहे. मीरा भाईंदर महापालिकेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल, अशीच चिन्हे आहेत. एक झालेल्या विरोधकांच्या कडव्या विरोधाचा सामना करत आ. नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर विधानसभा मात्र स्वबळावर खेचून आणली होती. आपल्या त्याच कामगिरीची पुनरावृत्ती मेहता हे या महापालिका निवडणुकीतही करतील, अशी खात्री भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला आहे. त्यामुळेच प्रदेश भाजपातर्फे मेहता यांच्या पाठिशी संपुर्ण संघटनात्मक ताकद उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही महापालिका प्रचारात जास्तीत सभा देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बाबूल सुप्रियो आणि मनोज तिवारी हे देखील प्रचारात सहभागी होणार आहेत. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश बापट आणि जयकुमार रावल यांच्या सभांचीही चाचपणी केली जात आहे. त्यांच्या जोडीला कल्याण डोंबिवली आणि पनवेल महापालिका निवडणुकीत अभुतपुर्व कामगिरी करणारे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, स्थानिक खासदार कपिल पाटील, संघटन मंत्री सतिश धोंड, मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे हे देखील प्रचारावर लक्ष ठेवून आहेत.