पनवेल :बाबुराव खेडेकर
पनवेल मधील मुजोर रिक्षा चालक मीटर प्रमाणे रिक्षा चालवत नाहीत हि बोंब नेहमीचीच असताना शहर परिसरात ५० टक्के रिक्षा ह्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात परमिट नसणे,विमा नसणे,पीयुसीचा अभाव आदी बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी आरटीओने ५० रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.
अलीकडच्या ४ महिन्यात आरटीओने शहर परिसरातील ७२४ रिक्षांची तपासणी केली. त्यात तब्बल ३६९ रिक्षा विविध बोगस प्रकारात दोषी आढळल्या आहेत. यात परमिट नसने,मीटरमध्ये फेरफार करणे,विम्याची संपलेली मुदत,पीयूसी न करणे,जादा प्रवासी बसवणे,प्रवाशांशी उद्धट वागणे आदी प्रकारात दोषी रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून ११ लाख ५८ हजार रुपयांची वसुली आरटीओने केली आहे.
आरटीओने दिलेल्या माहितीप्रमाणे ३६९ रिक्षाचालक यात दोषी आढळले आहेत. २३८ रिक्षाचालकांकडे आवश्यक असलेले परमिट नाही तर २३१ रिक्षाचालकांनी रिक्षाचा विमाच काढला नसल्याचे आढळले आहे. ४३ रिक्षाचालकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच ४० रिक्षाचालकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले आहे. १७ रिक्षाचालकांनी जादा प्रवासी वाहतूक केल्याचे आढळले आहे. तसेच ८ रिक्षाचालकांनी प्रवासी नाकारण्याच्या घटना घडल्या आहेत. तर परमिट रद्द झाल्यावरही ५ रिक्षाचालक रिक्षा चालवताना आढळले आहेत. या मोहिमेअंतर्गत आरटीओने ५१ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.
कोट
१५ रिक्षाचालकांना विविध प्रकरणात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या रिक्षाचालकांविरोधात आलेल्या तक्रारींच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे.
हेमांगिनी पाटील
वाहतूक उपनिरीक्षक
रिक्षाचालक वारंवार भाडे नाकारतात. उद्धटपणे प्रवाशांशी वागतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.
भरत जाधव
आरटीआय कार्यकर्ते
रिक्षावाल्यांशी नाहक भांडत बसू नका त्याचा काहिच फायदा होणार नाही. आपल्याला न्यायालयात लढा द्यायचा आहे.त्यासाठी चालू तारखेच्या जास्तीत जास्त रिक्षाचालकांबाबत तक्रारी लेखी स्वरूपात द्या असे आवाहन सिटीझन्स युनिटी फोरम पनवेलचे अध्यक्ष अरूण भिसे यांनी नागरिकांना केले आहे.
शहरातील सिटीझन्स युनिटी फोरम आणि जन जागृती ग्राहक म॔च पनवेल मधील रिक्षा मिटरप्रमाणेच चालाव्यात यासाठी सातत्याने लढा देत आहे. त्यासाठी उभय संस्थांनी हायकोर्टात एक जनहित याचिकाही दाखल केलेली आहे. आता 3 वर्षांनंतर ती याचिका कुठल्याही क्षणी कोर्टाच्या बोर्डावर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कफ आणि ग्राहकमंचला चालू तारखेच्या जास्तीत जास्त रिक्षाचालकांबाबत तक्रारी हव्या आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता शहरात रिक्षा मीटरप्रमाणे चालत नाहीत. शिवाय कमी अंतराचे भाडे नाकारणे,वाट्टेल ते दर आकारणी करणे या प्रवाशांच्या तक्रारी वारंवार येत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही मीटरप्रमाणे रिक्षा चालत नसेल किंवा अन्य तक्रारींसाठी 9004670146 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन केले होते. या क्रमांकावर २२ तक्रारी आल्या होत्या. संबंधित रिक्षाचालकांना आरटीओने नोटीस दिल्यानंतर त्यातील ३ रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात ३३०० रुपये दंड जमा केला आहे अशी माहिती वाहतूक उपनिरीक्षक हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे .

तक्रारी या स्वरूपात द्यावेत
प्रवासाची तारीख व वेळ
रिक्षा नंबर MH (06/46)(आद्याक्षरे) ( नंबर)
प्रवास कुठून कुठपर्यंत केला ?
मिटर टाकले का? होय / नाही
रिक्षाभाड्याची घेतलेली रक्कम
रिक्षावाल्यांच्या वर्तणूकी बद्दलही तक्रार यात देता येइल.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मीटरप्रमाणे रिक्षा चालत नसेल किंवा अन्य तक्रारींसाठी 9004670146 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन केले होते. या क्रमांकावर २२ तक्रारी आल्या होत्या. संबंधित रिक्षाचालकांना आरटीओने नोटीस दिल्यानंतर त्यातील ३ रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात ३३०० रुपये दंड जमा केला आहे
हेमांगिनी पाटील
वाहतूक उपनिरीक्षक,पनवेल