संदीप खांडगेपाटील : 8369924646 / 8082097775
* आग विझविण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाच नादुरूस्त
* अग्निशमन यंत्रणा बजावणार उडिसा भवनाला नोटीस
* अग्निशमनची वाहने तात्काळ पोहोचल्याने टळली दुर्घटना
नवी मुंबई : वाशी रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उडिसा भवनमध्ये दुसर्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना गुरूवारी (दि. 3 ऑगस्ट) घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसून आग लागलेल्या खोलीतील एक गादी जळाली आहे आणि विद्युत वायरींचे नुकसान झाले आहे.
गुरूवारी सांयकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वेस्थाकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेक्टर 30 ए वरील उडिसा भवनात दुसर्या मजल्यावरील एका खोलीमध्ये एसीमधील वायरींचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली.उडिसा भवनमध्ये त्यांच्या राज्यातून आजारपणामुळे त्रस्त झालेले लोक मुंबईला उपचार करण्यासाठी आल्यावर प्राधान्याने निवास करतात. आग लागल्यावर तात्काळ या मजल्यावर असणार्या 50 रूग्णांना तातडीने हलविण्यात आले. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमनच्या कर्मचार्यांना व अधिकार्यांना उडिसा भवनमध्ये आग विझविण्यासाठी उपलब्ध असलेली यंत्रणाच नादुरूस्त असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उडिसा भवनला नोटीस पाठविणार असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या अग्निशमच्या कर्मचार्यांनी दिली. या घटनेमुळे वाशी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या परराज्यातील भवनाची अंर्तगत सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.