दिपक देशमुख
नवी मुंबई : वाशी येथील प्रसिद्ध अश्या मोक्याच्या ठिकाणातील शिवाजी चौकातील विलोभनीय सौन्दर्य देणारे कारंजे गेल्या अनेक महिन्या पासून बंद अवस्थेत असलेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या कारंज्याचे डबके झाले असून येणारे जाणारे महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत.
मनपाने कोटयावधी रुपये खर्च करून शिवाजी चौकातील रुपडे बदलले होते.त्यासाठी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला शिवाजी महाराजावर आधारित कलाकृती केली होती.तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोराच्या चार बाजूला सुंदर असे कारंजे निर्माण केले गेले होते.पहाटे व संध्याकाळ नंतर येथील वातावरण विलोभनीय दिसत होते. मनपाच्या वतीने आजपर्यंत अश्या वेगळ्या प्रकारचे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेले परंतु त्याची देखभाल करण्यास कोणताही घटक लक्ष देत नसल्यामुळे साहजिकच त्यामुळे सर्व पाण्यात जात असल्याचे मत शिवभक्त अविनाश रोकडे यांनी व्यक्त केले आहे. वाशी चौकातील कारंजे बंद असल्यामुळे येथील सोंदर्याची पुरती वाट लागली असून लवकरात लवकर हे कारंजे सुरु करावेत अशी मागणी अनेक शिवभक्त करत आहेत. या बाबत सहाययक आयुक्त महेंद्रसिग ठोके यांना विचारले असता,लवकरात लवकर हे कारंजे सुरु करतो असे सांगितले.