नवी मुंबई : मुंबईमध्ये 9 ऑगस्ट 2017 रोजी काढण्यात येणार्या राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच्या जनजागृतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमध्ये उद्या 6 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3 ते 6.30 या वेळेत जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा बाबत जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज, नवी मुंबई-रायगड तर्फे मराठा क्रांती मोर्चा पूर्वी तीन दिवस आधी म्हणजे 6 ऑगस्ट 2017 रोजी मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये रायगड मधील सर्व मराठा बांधव उत्सव चौक, खारघर येथे सायंकाळी 5 वाजता जमा होऊन पुढे शिवाजी चौक वाशी या ठिकाणी 6.30 वाजता शिववंदना घेऊन रॅलीचा समारोप करतील.
सकल मराठा समाज, नवी मुंबई – रायगड तर्फे मुंबईमध्ये काढण्यात येणार्या मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी सुरु आहे. रायगड, नवी मुंबई मधील मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. कोपर्डी मधील बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध आणि अन्य मागण्यांसाठी सुरु झालेले मराठा क्रांती मोर्चाचे वादळ महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईमध्ये अधिक तीव्र स्वरूपात धडकेल अशी चिन्हे दिसत आहेत.
रॅलीसाठी कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल, संपूर्ण पनवेल तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पनवेल येथे दुपारी 2:30 वाजता जमायचे आहे. दुपारी 3 वाजता रॅली सुरू होणार आहे.
* रॅलीचा मार्ग – नवी मुंबई
दिघा-ऐरोली-घणसोली-कोपरखैरणे-वाशी – सानपाडा –
जुईनगर – बेलापूर मार्गे उत्सव चौक, खारघर
* रॅलीचा मार्ग – रायगड
पनवेल-नवीन पनवेल-खांदा कॉलनी-कामोठेकळंबोली-उत्सव
चौक, खारघर