नवी मुंबई : झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंचल चटर्जी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व अन्य काँग्रेस कार्यकत्यांंच्या उपस्थितीत काँग्रेस भवनासमोर गुजरात येथे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भाजपाविरोधी घोषणा देवून तीव्र निषेध करण्यात आला व राहुलजी गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत अषा घोशणा देण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर अविनाश लाड, माजी उपमहापौर अनिल कौशिक, प्रदेश सचिव भूपेन्द्र गुप्ता, संतोश शेट्टी, निला लिमये, सुधीर पवार, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, पाणी पुरवठा व मलःनिस्सारण समितीच्या सभापती अंजली वाळुंज, झोपडपट्टी व समाज कल्याण समितीच्या सभापती अनिता मानवतकर, माजी आरोग्य सभापती पुनम पाटील, नगरसेविका वैजयंती भगत, मंदाकिनी म्हात्रे, ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष-निशांत भगत, अंकुश सोनावणे, सुरेश नायडु, माजी नगरसेवक एकनाथ तांडेल, दिपक पाटील, विजय वाळुंज, इरफान पटेल, काँग्रेस पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.