दिपक देशमुख
नवी मुंबई : येत्या रक्षा बंधनाचा औचित्य साधून नेरूळ शिवसेना शाखा क्रमांक 86 व त्रिमूर्ती महिला मंडळाच्या वतीने खास सफाई कामगार व रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी रक्षा बंधनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष आणि स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी दिली.
नेरूळ सेक्टर सहा येथील साफसफाई कामगार कार्यालय,हनुमान मंदिर लगत रक्षाबंधनाचा कार्यक्रम सोमवारी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे .
नेरूळ विभागातील टॅक्सी, रिक्षा चालक आपल्यासाठी रात्री अपरात्री नागरिकांना सेवा देतात. स्वच्छतेची देखभाल सफाई कामगार नियमित घेतात.त्यांच्या प्रति असलेले प्रेम दाखवण्याची संधी रक्षा बंधनाच्या दिवशी प्राप्त होते. म्हणून एक सामाजिक बांधिलकी दाखवित रक्षा बंधन दिनी आम्ही या भावांना राख्या बांधणार असल्याचे आयोजक व त्रिमूर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता आमले यांनी सांगितले.