स्वयंम न्यज ब्युरो :8369924646 / 8082097775
नवी मुंबई : मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्षांची वाढ होत नाही. महापालिकेत महिला नगरसेविकांचा कारभार मिस्टर नगरसेवक पाहत असतानाच या पार्श्वभूमीवर वाशी प्रभाग 63 मधील भाजप नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे याची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. पावसामुळे प्रभागातील पदपथ निसरडे झाल्याची तक्रार प्रभागातील रहीवाशांकडून ब्लिचिंग पावडर टाकून नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी पालिका कर्मचार्यांच्या मदतीने पदपथाची सफाई करत पदपथांचा निसरडेपणा व शैवाळ व ओलसरपणा काढून टाकण्याची कामगिरी केली आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजाराचा उद्रेक प्रभागात होवू नये व प्रभागातील रहीवाशांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून 15 दिवसापूर्वी स्वखर्चाने प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुरीकरण व जंतुनाशक पावडरची फवारणी नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी सुरू केल्याने चर्चेच्या प्रकाशझोतात त्या आपल्या कामामुळे आल्या आहेत. त्यातच प्रभागातील वाशी सेक्टर 1 आणि 2 परिसरातील रहीवाशांकडून पावसामुळे पदपथ निसरडे व ओलसर झाल्याची तक्रारी नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांना प्राप्त झाल्या. या तक्रारीचे तात्काळ निवारण करताना सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी वाशी सेक्टर 1 व 2 परिसरातील सर्व पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकून पालिका कर्मचार्यांच्या मदतीने त्यांनी पदपथांची स्वच्छता करून घेतली आहे. परिसरातील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी व समस्या सांगण्यासाठी नगरसेविका सौ. दमयंती संपत शेवाळे यांनी हेल्पलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. या हेल्पलाईनर तक्रारी अथवा समस्या येताच तात्काळ सौ. दमयंती संपत शेवाळे यांच्याकडून तक्रारींचे व समस्यांचे निवारण होत असल्याची माहिती परिसरातील रहीवाशांकडून देण्यात येत आहे.