मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधीत्व करणा-या सुकाणू समितीला जीवाणू समिती आणि आंदोलक शेतक-यांना देशद्रोही म्हटल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करित आहे. या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज म्हटले होते.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शेतक-यांना साले म्हटले आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही वेळोवेळी शेतक-यांची अवहेलना केली आहे. भाजप नेत्यांची ही वक्तव्ये भाजपची संस्कृती दर्शवतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या पदाला अशा त-हेची भाषा शोभनीय नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.