नवी मुंबई : दिपक देशमुख
मनपाच्या ऐरोली येथील रुग्नालयातील सेवेचा बोर्या उडाला असतानाच आता सोनोग्राफी मध्ये बिघाड झाल्याने अनेक रुग्णांना चुकीचे रिपोर्ट येत असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याचा फटका गरोदर मातांना जास्त बसत असल्याने सोनोग्राफीच्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी एका महिलेचे पती परशुराम उबाळे यांनी केले आहे.
ऐरोली सेक्टर 3 येथे मनपाचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय जरी जनरल असले तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर माता व बाळ रुग्णाशिवाय येथे कोणत्याही रुग्णाला दाखल करून घेत नसल्याचे वास्तव आहे. ह्या रुग्नालयातील सोनोग्राफीचा ठेका वेंडू डायग्नोस्टिकला दिला आहे.
मनपाच्या रुग्नालयात गरोदर मातावर उपचार व बाळंतपण हे विनामूल्य होत असल्याने दिघा, ऐरोली, रबाले व घणसोली परिसरातील शेकडो महिला येथे उपचारा साठी येथे येत असतात.
घणसोली येथील संगीता उबाळे यांना सुद्धा उपचारासाठी याच रुग्णालयात सहा दिवसापूर्वी आणले होते.त्यांच्या गर्भाशयात पाणी कमी आहे.म्हणून श्रीरोग तज्ज्ञाने दाखल करून घेतले. गर्भाशयात अपेक्षित पाणी वाढावे म्हणून डॉक्टरांनी उपचार सुरु करून तीन वेळा सोनोग्राफीही काढली. परंतु उपचार करूनही अपेक्षित पाणी वाढल्याचे दिसून येत नसल्यामुळे डॉक्टरही चक्रावून गेले. पाणी वाढत नसेल तर बाळ दगाऊ नये म्हणून तात्काळ शिजरींग करणे गरजेचे असल्यामुळे संगीता उबाळे यांचे पती परशुराम उबाळे यांनी खाजगी सेंटर मध्ये क्रॉस तपासणी करण्याचे ठरविले. त्यांनी सेक्टर 4 येथील माया डायग्नोस्टिक मध्ये तपासणी केली. त्यामध्ये मात्र गर्भाशयात अपेक्षित असे पाणी आढळून आले. यावर मनपाने ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे त्यांची यंत्रणा चुकीचे रिपोर्ट देत असल्याचे आढळून आल्याने अशा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी परशुराम उबाळे यांनी केली आहे.
सोनोग्राफीच्या जुन्या यंत्रणेमुळे आजतागायत अनेक रिपोर्ट चुकीचे येत असल्यामुळे त्याच्या त्रासाचा फटका स्त्रीरोग तज्ज्ञांना बसत असल्याचे आरोग्य सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपलब्ध असणार्या यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवावेत अशी मागणी अनेक रुग्ण करत आहेत. नाहीतर एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो असे मत परशुराम उबाळे यांनी व्यक्त केले आहे.
या बाबत ऐरोली रुग्णालयाच्या प्रमुख डॉ.वर्षा राठोड यांना विचारले असता, आम्ही तशा अशायची नोटीस संबंधित ठेकेदाराला दिली असल्याचे सांगितले आहे अशी माहिती दिली.
ऐरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी रूग्णालयास वरचेवर भेटी देवून रूग्णालयीन असुविधांचा आढावा घेतल्यास रूग्णाच्या गैरसोयी मोठ्या प्रमाणावर कमी होतील अशी चर्चा रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये सुरू आहे.