स्वयंम न्यूज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : पावसामुळे निसरडे झालेले पदपथ आणि ओलसरपणा यामुळे रहीवाशांना पदपथावरून चालणे अवघड होवून बसले. या पार्श्वभूमीवर प्रभाग 87मधील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करून घेतली आहे.
गुरूवारी महापालिका प्रशासनाच्या कर्मचार्यांनी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देताना प्रभाग 87 मधील नेरूळ सेक्टर 8 आणि सेक्टर 10 मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून सफाई केली. यावेळी पालिका कर्मचार्यांसमवेत युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे उपस्थित होते. पालिका कर्मचार्यांनी ब्लिचिंग पावडर टाकून पदपथावर स्वच्छता अभियान राबविल्याने नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.