नवी मुंबई : 6 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2017 या कालावधीत भारतात संपन्न होणा-या 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल फिफा 2017 स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई हे एक यजमान शहर (Host City) असून आज ‘होस्ट सिटी’ लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उप महापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., शिवसेना युवासेना प्रमुख तथा मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, स्पर्धेचे संचालक जेविअर सेवी आदी उपस्थित होते.