सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गुरुग्राम दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत प्रद्युमन ठाकूर या शालेय मुलाच्या झालेल्या हत्येने देशभरातील पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी सुरक्षिततेचे नियम पाळा अन्यथा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भवितव्याशी खेळलात तर मात्र मी ते कदापि सहन करणार नाही या आशयाचे मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी लिहिलेले पत्र नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल शाळा, एपीजे शाळा, सेंट ऑगस्टीन शाळा व इतर शाळांना देण्यात आले.
विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय स्तरावर शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत का? प्रथमोपचार पेटी आहे का ?? समुपदेशक आहेत का?? तक्रार पेटी आहे का ?? शाळा परिवहन समिती आहे का ?? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शाळेच्या प्राचार्य व्यवस्थापनाला केला. यावेळी आदरणीय राजसाहेबांनी शाळा प्राचार्य व विश्वस्त यांच्यासाठी लिहिलेले पत्राचे वाचनही प्रचार्यांसमोर करण्यात आले. तसेच उपरोक्त सर्व सुरक्षिततेची पाहणीही मनसेने याप्रसंगी केली.
शालेय सुरक्षिततेबरोबर स्कूल बस सुरक्षिततेचे अनेक नियम मनसेने याप्रसंगी शालेय व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिले. यात हलगर्जीपणा केल्यास मनसे स्टाइल उत्तर देण्यात येईल असा सूचक इशारा मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी याप्रसंगी दिला.
लवकरच नवी मुंबईतील सर्व १५० ते २०० खाजगी/ मनपा शाळांना आदरणीय राजसाहेबांचे पत्र देण्यात येईल तसेच पोलीस प्रशासन, आरटीओ, वाहतूक विभाग, शिक्षण अधिकारी यांना पत्र देऊन विद्यार्थी सुरक्षिततेच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करू असे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. तसेच नवी मुंबई मनसे प्रभाग समितीनुसार लवकरच दक्ष नागरिक मंचची स्थापना करून शाळा सुरक्षा व स्कूल बस सुरक्षा या बाबींवर लक्ष ठेवेल असे देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, निखील गावडे, महिला सेनेच्या अनिथा नायडू, चित्रपट सेनेचे श्रीकांत माने, विभाग अध्यक्ष विनय कांबळे, सचिन कदम, नितीन चव्हाण, अभिजित देसाई, राजेश ढवळे, चंद्रकांत महाडिक, अप्पासाहेब कोठुळे, स्वप्नील गाडगे, शशिकांत कळसकर, योगेश कुंभार, अमोल मापारी, सुहास मिंडे, रमाकांत साळवे, सतीश पडघन, सागर नाईकरे, गणेश भोसले व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.