सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, प्रभाग ८५ आणि ८६च्या वतीने नेरूळ सेक्टर सहा, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर दहा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास कुकशेत व सारसोळे गावातील ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहा आणि दहामधील रहीवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ई.सी.जी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, सिबिसी, शुगर आदी तपासणी करण्यात आली. नेरूळ सेक्टर सहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात सुश्रुषा हार्ट केअर सेंटरच्या सौजन्याने तर कुकशेत गावातील आणि नेरूळ सेक्टर दहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात सनशाईन हॉस्पिटलच्या सौजन्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नेरूळ सेक्टर सहाच्या कार्यालयात १०० हून अधिक रहीवाशांनी, कुकशेतच्या कार्यालयात ७० रहीवाशांनी, नेरूळ सेक्टर दहाच्या कार्यालयात ८५ रहीवाशी सहभागी झाले असल्याचे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या विकासाकरिता लोकनेते गणेश नाईकांनी केलेले परिश्रम जवळून पाहिले आहेत. नवी मुंबईचा विकास हा आपला श्वास घेवून वावरणार्या लोकनेते गणेश नाईकसाहेबांना आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रमातून शुभेच्छा देण्याचा हा प्रयत्न केला असल्याचे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी सांगितले.