नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या प्रदेश कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची बैठक आज टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अनुसुचित जाती विभागाचे मेळावे घेण्याचा निर्णय झाला असून लवकरच नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे राज्याचा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनुसुचित जातीमधील कामगार, वकील, डॉक्टर, इंजिनीयर, उद्योजक, प्राध्यापक अशा सर्व वर्गांना सोबत घेऊन प्रत्येक गावात अनुसुचीत जातीतील सर्व घटकांना पक्षासोबत जोडून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. राजू वाघमारे म्हणाले.
या बैठकीस अनुसुचीत जाती विभागाचे महाराष्ट्र प्रभारी ख्रिस्तोफर टिळक, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.