सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
* परिचारिकांनी मोठ्या संख्येने इंटकसह महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारले
नवी मुंबई : कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत एमआयडीसीतील खासगी कंपन्या व कारखान्यातील सदस्य इंटकचे सदस्य होत असतानाच मंगळवारी (दि. २७ सप्टेंबर) महापालिका आरोग्य विभागातील परिचारिकांनी मोठ्या संख्येनने रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित इंटकसह महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारले.
मंगळवारी दुपारी रवींद्र सावंत यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला माता बाल रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिका आणि आरोग्य सहाय्यक उपस्थित होत्या. यावेळी बैठकीमध्ये परिचारिका आणि आरोग्य सहाय्यक यांनी कामाच्या वेळेत आपल्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यत काम करणे, साप्ताहिक सुट्टीही न मिळणे, कामाऐवजी संगणकीय काम व अहवालाचाच अतिरिक्त भार देणे, कर्मचार्यांशी बोलताना अधिकार्यांची संभाषणातील अरेरावी, अपमानास्पद भाषेचा वापर यासह नानाविध समस्या परिचारिकांनी, आरोग्य सहाय्यकांनी कथन केल्या. यावेळी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाडही उपस्थित होते.
यावेळी चर्चेमध्ये रवींद्र सावंत यांनी इंटकच्या माध्यमातून परिचारिका आणि आरोग्य सहाय्यकांची समस्यांतून मुक्तता करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पालिका प्रशासनाने परिचारिका आणि आरोग्य सहाय्यकांना समस्यातून मुक्त न केल्यास विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसच्या माध्यमातून लक्षवेधी मांडून पालिका प्र्रशासनाच्या अत्याचाराचा पाढा विधानसभा आणि विधान परिषदेत मांडणार असल्याचे रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.